Bike accidents due to road potholes; Woman injured
मालवण चौके धामापूर कुडाळ मार्गावर काळसे येथे श्री देव रवळनाथ मंदिर ते आजगावकर इको स्टोअर दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढली आहे. दरम्यान गुरुवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी दुपारी या रस्त्यावरील भल्यामोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकी चालकाचा वाहनावरील ताबा सुटून अपघात झाला आणि त्यामध्ये दुचाकीवर मागे बसलेल्या सौ. साक्षी शंकर पाटील राहणार काळसे चुडनाईकवाडी या तोल जाऊन रस्त्यावर पडल्या आणि त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन जखमी झाल्या आहेत. कुडाळ ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.
साक्षी पाटील यांच्या अपघातानंतर स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराविरोधात रोष व्यक्त केला आहे.
मालवण / प्रतिनिधी