बेळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. नवे अधिकारी दाखल झाले आहेत. पोलीस दलाबद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वासाची भावना निर्माण व्हावी, यासाठी माळमारुती पोलिसांनी रविवारी आपल्या कार्यक्षेत्रात बाईक पेट्रोलिंगचा उपक्रम राबविला. पोलीस आयुक्त व उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जगदीश हंचिनाळ, उपनिरीक्षक जी. व्ही. कल्याणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुन्हेगारांना इशारा देण्यासाठी, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण करण्यासाठी बाईक पेट्रोलिंग केले. कायदा व सुव्यवस्था परिस्थिती राखण्याबरोबरच गुन्हेगारीला आळा घालणे, महिला सुरक्षिततेवर भर देणे, महिलांची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंना दम देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.मोटारसायकलवरून पोलिसांनी संपूर्ण परिसरात पेट्रोलिंग केले. आझादनगर, गांधीनगर, दीपक गल्ली, उज्ज्वलनगर, न्यू गांधीनगर, अमननगर, मारुतीनगर परिसरात फेरफटका मारला. आणीबाणीच्या प्रसंगी जवळच्या पोलीस स्थानकाशी संपर्क साधा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा संदेश देत नागरिकांच्या मनात पोलीस दलाबद्दल विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.
Previous Articleशस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन
Next Article शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.