प्रतिनिधी / येळूर : वडगाव – येळूर रस्त्यावरील बळ्ळारी नाल्याजवळ असलेल्या राईसमिल समोर मोटरसायकल घसरून मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना सोमवारी सकाळी अकराच्या दरम्यान घडली.
मोटरसायकलस्वार वडगाव कडून येळूरकडे येत असताना ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात एक्टिवा स्कूटर रस्त्याच्या बाजूला गेली. यावेळी दुचाकीवरील नियंत्रण सुटून सदर इसम रस्त्यावर पडला. डोक्याला हेल्मेट नसल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. डोके फुटून मेंदू बाहेर पडला आहे. त्यामुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. भीषण असे दृश्य या ठिकाणी दिसून येत होते. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दक्षिण रहदारी पोलीस स्थानकामध्ये या घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत