Tarun Bharat

बाइकवरून 11 देशांची सैर

Advertisements

13 हजार किलोमीटरचा प्रवास

कुनले एदियांजो यांनी अलिकडेच लंडन ते लागोसपर्यंतचा प्रवास बाइकने पूर्ण केला आहे. हा प्रवास पूर्ण करण्यास त्यांना 41 दिवसांमध्ये 13 हजार किलोमीटर अंतरापर्यंत बाइक चालवावी लागली आहे. विशेष बाब म्हणजे यादरम्यान त्यांनी 11 देशांच्या 31 शहरांना स्वतःच्या प्रवासात सामील केले.

तसेही कुनले यांनी यापूर्वीही अनेक चकित करणाऱया गोष्टी केल्या आहेत. आफ्रिकेतील सर्वात उंच शिएखर किलिमंजारो त्यांनी दोनवेळा सर केला आहे. तर लागोसहून (नायजेरिया) अक्रा (घाना)दरम्यान 460 किलोमीटरचे अंतर सायकलद्वारे त्यांनी केवळ 3 दिवसात कापले होते.

परंतु यावेळी त्याहंनी बाइकद्वारे ही अनोखी कामगिरी केली आहे. लंडनहून नायजेरियाच्या लागोसपर्यंत त्यांनी बाइकद्वारे प्रवास केला आहे. परंतु त्यांच्या या प्रवासाचा उद्देश पोलिओसाठी पैसे जमविणे होता. हा प्रवास त्यांनी रोटरी क्लब ऑफ इकोई मेट्रो, नायजेरियाच्या मदतीने केला. या क्लबमध्ये अलिकडेच ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत.

बाइकद्वारे एवढा मोठा प्रवास करण्यामागील उद्देश पोलिओ लसीकरणासाठी पैसे जमविणे होता. बालपणातील माझा एक खास मित्र पोलिओने ग्रस्त होता. आम्ही जेव्हा खेळायचो, तेव्हा त्याला त्यात सामील होता येत नव्हते. काही वर्षांपूवीं त्याचा मृत्यू झाला होता. जर त्याला पोलिओ झाला नसता तर तो आज जिवंत असता असे कुनले यांनी म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने नायजेरियाला 2020 मध्ये पोलिओमुक्त घोषित केले असले तरीही देशात अद्याप काही रुग्ण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दरदिनी 1 हजार किमी प्रवास

कुनले यांनी दरदिनी 1 हजार किलोमीटर अंतराचा प्रवास बाइकने केला आहे. यादरम्यान त्याहंनी 53 अंश सेल्सिअस तापमानालाही तेंड दिले. सहारा वाळवटातील तापमान अत्यंत कष्टदायक आहे, जर तेथे कुणी थांबले तर सहारा वाळवंटच त्याचा जीव घेईल असे वाटले होते. प्रवास करताना माझ्याकडे एकदा केवळ 1 लिटर पाणी शिल्लक राहिले होते आणि 450 किलोमीटरचा प्रवास करायचा होता, परंतु यादरम्यान काही लोक डेझर्ट सफारी करत होते, त्याहंनी मला मदत केल्याचे कुनले यांनी सांगितले.

Related Stories

कोरोनाच्या नव्या स्वरुपामुळे जगभरात धास्ती

Patil_p

काबूलमध्ये पुन्हा स्फोट

Abhijeet Shinde

रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन यांना कोरोनाची बाधा

datta jadhav

मध्य मेक्सिकोतील गोळीबारात 19 ठार

Patil_p

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 60 लाखांच्या उंबरठ्यावर

datta jadhav

कोल्हापूरच्या लीना नायर ‘शनैल’च्या सीईओपदी

Amit Kulkarni
error: Content is protected !!