Jayant Patil : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा वाढदिवस 16 फेब्रवारीला आहे. त्यांच्या वाढदिवसाची तयारी करण्यासाठी कार्य़कर्ते कामाला लागले आहेत. दरम्यान, नेपियन्सी रोडवर एका कार्येकर्त्याने रस्तोरस्ती बॅनर लावले आहेत.याची चर्चा सध्या सोशल मीडियासह राज्यभर होत आहे.
जयंत पाटील यांच्या वाढदिवसामिनित्त मुबईत त्यांच्या घरासमोर एका तालुका प्रतिनिधीने घराबाहेर बॅनर लावला आहे. ज्यामध्ये जयंत पाटील भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. नेपियन्सी रोडवर हे बॅनर सध्या झळकत आहेत. #Boss माझं दैवत भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे हे बॅनर आहेत. संतोष पवार असे बॅनर लावणाऱ्याचे नाव आहे.
दरम्यान, एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का असा प्रश्न विचारल्यावर जयंत पाटील म्हणाले होते की, एवढ्या वर्ष राजकारणात राहिल्यानंतर मुख्यमंत्री व्हावे असे कोणाला नाही वाटणार.त्यांची हीच इच्छा आता कार्यकर्त्यांनी देखील बॅनर मधून बोलून दाखवली आहे.

