Tarun Bharat

बिटस् पिलानीचे विद्यार्थी फोर्ब्स 30 आशिया 2022च्या यादीत

प्रतिनिधी /वास्को

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 30 वर्षाखालील फोर्ब्स 30 – आशिया 2022 च्या यादीत बिटस् पिलानीच्या आठ आजी व माजी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापैकी पाच के के बिर्ला गोवा कॅम्पसमधिल आजी-माजी विद्यार्थी आहेत.

फोर्ब्सची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर बिटस् पिलानी के के बिर्ला गोवा कॅम्पसचे संचालक प्रा. सुमन कुंडू यांनी ब्लूलर्नचे सहसंस्थापक हरीष उथयकुमार व श्रेयांश संचती यांना आमंत्रीत केले व त्यांचा सत्कार केला. स्टार्टअप इकोसिस्टमच्या वाढीबद्धल आणि विद्यार्थ्यांना सशक्त बनवण्याबाबत प्रा. कुंडू यांचे विचार विश्वसनीय आहेत. यामुळे गोवा कॅम्पसमधून आणखी संस्थापक तयार होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या सत्कार सोहळय़ाला असोसिएट डीन प्रा. वीकी बाथ्स उपस्थित होते.

27 मे रोजी जारी करण्यात आलेल्या फोर्ब्स 30 आशिया 2022 यादीत तरूण उद्योजक व उगवते तारे आहेत. जे आशियातील व्यवसायीक आणि सामाजीक भवितव्य उज्वल करत आहे.

के के बिर्ला गोवा कॅम्पसचे माजी विद्यार्थी मल्हार पाटील, रजत गुप्ता व शौर्य अगरवाल हे फ्लॅम ऍपचे संस्थापक आहेत. त्यांनी स्टार्टअप्समध्ये अलिकडेच गुंतवणूक केली आहे. के के बिर्ला गोवा कॅम्पसचे माजी विद्यार्थी हरीश उथयकुमार व श्रेयांश संचेती हे ब्ल्यूलर्नचे संस्थापक आहेत. त्यांनी प्री सीड फेरी उभी केली आहे. तसेच पिलानी कॅम्पसचे माजी विद्यार्थी अहमद फराज, हर्षित अवस्थी व सशक्त त्रिपाठी हे कलाम लॅबचे संसथपक आहेत.

या व्यतिरिक्त आरोग्य सेवा व विज्ञान श्रेणीत प्रसन्न दाते हे सध्याच्या तंत्रज्ञानापेक्षा वेगवान क्वांटम मशिन लर्निंग तंत्र विकसीत करत आहे.

फायनान्स आणि व्हेंचर कॅपिटलमध्ये सजल खन्ना यांनी 2020 मध्ये लविका अगरवाल व जगवीर गांधी यांच्यासमवेत आयआयटीआर ची स्थापना केली आहे.

Related Stories

मुख्यमंत्र्यांनी जीवरक्षकांच्या समस्या त्वरित सोडवाव्यात

Patil_p

सोनिया, राहुल गांधी विश्रांतीसाठी गोव्यात

Patil_p

फोंडय़ात रंगला ‘डीजीटल राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव’

Amit Kulkarni

तार नदीतील जलपर्णीमुळे पुराची भीती

Patil_p

कुडचडेतील काँग्रेस कार्यकर्त्यांचा ‘आप’मध्ये प्रवेश

Amit Kulkarni

वेर्णा औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱयांच्या निदर्शनात पोलिसांचा हस्तक्षेप

Amit Kulkarni