Tarun Bharat

रितेश-जेनेलियाच्या कंपनीवर भाजपचा गंभीर आरोप; अवघ्या 10 दिवसात भूखंड मंजूरी कशी?

Ritesh-Genelia Deshmukh: अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लातूरमधील 16 उद्योजकांना डावलून देशमुखांना अवघ्या दहा दिवसांत भुखंड मंजूर करण्यात आले आहे.लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेनं त्यांना 116 कोटींचा पुरवठा काही दिवसातच कसा काय केला गेला असा सवाल भाजपने केला आहे.देश अॅग्रो प्रा. लिमिटेड कंपनीसाठी यंत्रणा वेगाने कामासा लागली. भुखंड मंजूरीसह कर्ज प्रकिया वेगाने पार पाडण्यात आल्याचा आरोपही भाजपने केला आहे. याबाबत देशमुख कुटुंबाकडून अजून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्या कंपनीबाबत आजपचे आरोप
रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्या देश अॅग्रो प्रा. लिमिटेड कंपनीची 23 मार्च 2021 रोजी स्थापना.
कंपनीत रितेश आणि जेनेलिया यांची 50 चक्के भागीदारी.
कंपनीचे साजे सातकोटी रूपये भाग भांडवल.
16 लोकांचा प्राधान्यक्रम बाजूला सारून भूखंड मंजुरीत देशमुखांना झुकतं माप दिल्याचा आरोप.
5 एप्रिल 2021 रोजी जागेसाठी अर्ज, 15 एप्रिल 2021 रोजी भूखंड मंजूरी.
22 जुलै 2021 रोजी जागेचा ताबा.
पंढरपूर को- ऑपरेटिव्ह बॅंकेत 4 ऑक्टोंबर 2021 रोजी अर्ज, 27 ऑक्टोंबरला कर्ज मंजूर.
लातूर जिल्हा बॅंकेत 5 ऑक्टोंबरला अर्ज, 61 आणि 55 कोटींचं कर्ज मंजूर.
साडेसात कोटी रुपये भागभांडवल असलेल्या कंपनीने 15 कोटी रुपये भूखंडासाठी भरले.

Related Stories

अस्त्रांपासून संगीत…शांततेचा संदेश

Patil_p

मानवी गाग्रूचा झाला साखरपुडा

Patil_p

महाराष्ट्रातील सर्वात वादग्रस्त निवडणूक ‘भाडिपा’ आणणार डिजिटल माध्यमांवर

Patil_p

अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण

Tousif Mujawar

लतादीदींच्या जन्मदिनानिमित्त राज ठाकरेंनी दिला आठवणींना उजाळा, पोस्ट व्हायरल

Archana Banage

सुशांत-रियाची जोडी जमली

tarunbharat