Tarun Bharat

भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी भाजपचे नेहमीच प्रयत्न

Advertisements

पालकमंत्री गोविंद कारजोळ : खानापुरात प्रचारसभा

वार्ताहर /खानापूर

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात भाजप सरकारने विकासाचे पाऊल पुढे टाकले आहे. देशाला भ्रष्टाचारमुक्त भारत बनविण्यासाठी अनेक योजना अंमलात आणल्या. सर्वसामान्य शेतकरी व शिक्षकांच्या समस्या दूर करण्यासाठी भाजप सरकारने नेहमी सकारात्मक पावले उचलली आहेत. वायव्य पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना मतदान करून निवडून आणावे, असे आवाहन केले. आगामी काळात म्हादई प्रकल्प पूर्णत्वाला आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. यासाठी एक हजार कोटांची तरतूद करण्यात आली आहे.

मंगळवारी शुभम गार्डनमध्ये आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुका घटकचे अध्यक्ष संजय कुबल होते. स्वागत माजी आमदार संजय पाटील यांनी केले. वायव्य पदवीधर मतदारसंघातील उमेदवार हणमंत निराणी यांनी, आपले मत देऊन मला निवडून आणावे, असे आवाहन पेले. वायव्य शिक्षक मतदारसंघातील उमेदवार आमदार अरुण शहापूर यांनी विचार व्यक्त केले. व्यासपीठावर आमदार आनंद मामनी, भारती मगदूम, विश्वनाथ पाटील, विठ्ठल हलगेकर, एन. रविकुमार, आमदार महांतेश दोड्डगौडर, प्रमोद कोचेरी, धनश्री सरदेसाई, विठ्ठल पाटील, जोतिबा रेमाणी, बाबुराव देसाई, शरद केशकामत, सुनील चिगुळकर उपस्थित होते.

Related Stories

स्वरमल्हारतर्फे उद्या गुरूपूजन-गायन कार्यक्रम

Amit Kulkarni

स्मार्ट बसथांबा हरवला अंधारात

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हा पंचायत सीईओंची बढतीवर बदली

Tousif Mujawar

अलायन्स क्लब इंटरनॅशनलच्या डिस्ट्रिक्ट कॅबिनेटचा अधिकारग्रहण

Amit Kulkarni

निपाणीजवळ दाम्पत्यास लुटले

Patil_p

निजदच्या चंद्रशेखर लोणी यांचे कडवे आव्हान

Omkar B
error: Content is protected !!