Tarun Bharat

डिचोलीत भाजप व मगोची सत्ता स्थापन होण्याच्या मार्गावर

Advertisements

भाजप व मगोचे नगरसेवक एकत्रित. भाजपचे दहापैकी चारजणांना बाहेरचा रस्ता ? राजकीय सत्तानाटय़ात जोरदार हालचाली.

रविराज च्यारी/डिचोली

 राज्यात विधानसभा निवडणूका पार पडल्यानंतर ज्याप्रकारे भाजपला मगो पक्षाने पाठिंबा देत सरकार स्थापनेत सहकार्य केले त्याचप्रमाणे डिचोली नगरपालिकेत सध्या भाजप व मगो पक्षाची सत्ता स्थापन होण्याच्या मार्गावर आहे. चौदापैकी दहा भाजपच्या नगरसेवकांमधील सध्या चार जणांना सत्तेपासून बाहेर ठेवत मगो पक्षाचे म्हणजेच माजी आमदार नरेश सावळ यांचे समर्थक असलेल्या दोन नगरसेविकांना बरोबर घेऊन भाजपच्या सहा नगरसेवकांनी उपनगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणला आहे. मात्र अविश्वास ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच उपनगराध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आणि आता तो स्वीकृत झाल्याची माहिती मिळली असल्याने या पालिकेवर आता भाजप व मगो (नरेश सावळ गट) पक्षाची सत्ता स्थापन होणार यात शंका नाही.

   विधानसभा निवडणुकीनंतर डिचोली नगरपालिकेतील राजकीय घडामोडी?ना वेग आला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेश पाटणेकर यांना चार नगरसेवकांनी काम न करता पक्षाशी दगाफटका केल्याचा दावा सध्या सत्ताधारी नगरसेवकांचा गट करीत आहे. त्याच अनुषंगाने उपनगराध्यक्षा तनुजा सतीश गावकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला आहे. अशी माहिती मिळाली होती. तर उपनगराध्यक्षा गावकर यांनी थेट आपल्या पदाचा राजिनामाच दिला होता. 

  विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेच या घडामोडी?ना प्रारंभ झाला होता. भाजपचे नगराध्यक्ष कुंदन फळारी, नगरसेवक विजयकुमार नाटेकर, निलेश टोपले, दिपा पळ, अनिकेत चणेकर, सुदन गोवेकर हे सहा जण असून प्रारंभी झालेल्या समिकरणात नरेश सावळ गटाच्या नगरसेविका अँड. रंजना समीर वायंगणकर व आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़? यांचे समर्थक नगरसेवक गुंजन कोरगावकर यांना बरोबर घेऊन आठ जणांच्या बहुमताने उपनगराध्यक्षा तनुजा गावकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याचे नियोजन होते. परंतु त्यावेळी नगरसेवक गुंजन कोरगावकर यांनी माघार घेतल्याने हे अविश्वास ठरावाचे नाटक काही काळासाठी पुढे गेले होते.

नरेश सावळ गटाचे दोन सदस्य आता सत्ताधारी गटात

   तत्पूर्वी सावळ गटाच्या नगरसेविका अँड. अपर्णा फोगेरी यांना बरोबर घेण्याचा इरादा भाजप नगरसेवकांच्या गटाने चालविला होता. परंतु तो सफल झाला नव्हता. गुंजन कोरगावकर यांनी माघार घेतल्यानंतर पुन्हा नगरसेविका अँड. अपर्णा फोगेरी यांना समवेत घेण्याचा विचार झाला. परंतु सदर विचार अर्ध्यावर ठेऊन भाजप गटाने थेट नरेश सावळ गटाच्या नगरसेविका सुखदा कमलाकर तेली यांच्याशी संपर्क साधून त्यांना आपल्या गटात समाविष्ट करून घेतले. त्यामुळे भाजपचे सहा व सावळ गटाचे दोन (सुखदा तेली व अँड. रंजना वायंगणकर) असे आठ जणांचे बळ तयार करून अविश्वास ठराव आणण्यात आला.

  उपनगराध्यक्षांनी दिला पदाचा राजिनामा

डिचोली नगरपालिकेत उपनगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव दाखल केलेल्या दिवशीच उपनगराध्यक्षा तनुजा गावकर यांनी आपल्या पदाचा राजिनामा सादर केला. यापूर्वी एक वर्षाचा कार्यकाळ संपताच तनुजा गावकर यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिला होता. परंतु नंतर त्यांनी राजिनामा मागे घेण्याच्या मुदतीत राजिनामा मागे घेतल्याने त्या या पदावर राहिल्या होत्या. आता आठ जणांच्या गटानुसार अविश्वास ठराव येणार असल्याचे कळताच त्यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिला होता. सदर राजिनामा स्विकारण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

 सत्ता राखण्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार प्रयत्न

  डिचोली नगरपालिकेत सध्या सुरू झालेले राजकीय नाटय़ दोन्ही गटांसाठी प्रति÷sचे बनले आहे. भाजपच्या सहा नगरसेवकांनी मगोच्या दोन जणांना बरोबर घेऊन खेळलेली खेळी मोडून काढण्यासाठी विरोधात राहिलेल्या सहा जणांच्या गटातील काही नगरसेवकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अविश्वास ठराव आणलेल्या गटातील नगरसेवकांना आपल्या बाजूने आणण्यासाठी काही राजकीय महाभाग वावरत आहेत. काही मतदारसंघातील व वरि÷ पातळीवरील राजकीय नेत्यांनीही या राजकारणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे उडी मारली असून सध्या सुरू असलेला खेळ तसाच रहावा यासाठी, तर काहींनी हा खेळ बिघडवून लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु अविश्वास ठराव आणलेले आठजण एकसंध असल्याने अविश्वास ठराव संमत होणार आणि त्यानंतर याच गटाचा उपनगराध्यक्ष होणार असाच अंदाज येतो.

या राजकीय समिकरणात “काहींमध्ये खुशी तर काहींमध्ये गम”

डिचोली नगरपालिकेच्या या राजकीय समिकरणात भाजपच्याच गटातील चार जणांना बाहेर ठेवल्याने त्यांच्या कार्यकर्ते तसेच पक्षातील हितचिंतकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींनी विधानसभा निवडणुकीतील निकालातील अपयश लक्षात घेऊन हे राजकारण योग्यच असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात लढलेल्या नरेश सावळ यांच्या समर्थनातील दोन नगरसेवकांना थेट आठ जणांच्या गटात समाविष्ट केल्याने भाजप पक्षातील काही स्थानिक नेते व कार्यकर्तेही नाराज झालेले आहे. परंतु जनतेच्या दृष्टीने सध्या चाललेले राजकारण योग्य असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य माणूस व्यक्त करताना दिसत आहे. त्यातच या राजकारणात सावळ गटाचा एक व आमदार डॉ. शेटय़? यांचा समर्थक नगरसेवक बाहेर राहिला आहे.

Related Stories

अडवई शाळा स्थलांतरित करू नका!

Amit Kulkarni

म्हापसा बोडगेश्वर समोरील मुख्य पाईपलाईन फुटून हजारो लीटर पाणी वाया

Omkar B

जिल्हा पंचायत भवन बांधण्यासाठी आपले प्राधान्य असेल

Amit Kulkarni

सासष्टीत कोरोना सकारात्मक रूग्णांच्या संख्येत वाढ

Omkar B

कृषी महोत्सवांवरील खर्च अनाठायी

Amit Kulkarni

‘लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर सर्व प्रवासी रेल्वे गाडय़ा रद्द

Omkar B
error: Content is protected !!