Tarun Bharat

राज्यसभेसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर; तिसऱ्या जागेसाठी धनंजय महाडिकांच्या नावाची चर्चा

ऑनलाईन टीम/तरुण भारत

राज्यसभेच्या उमेदवारीबाबत राज्यात वातावरण तापलं आहे, शिवसेनेने (shivsena) आपले दोन उमेदवार जाहीर केले आहेत. आता भाजपकडून (BJP) दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. पियुष गोयल (piyush goyal) आणि अनिल बोंडे (anil bonde) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर तिसरी जागाही भाजप लढणार असून तिसऱ्या जागेसाठी धनंजय महाडिक (dhananjay mahadik) यांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

देशातल्या १५ राज्यातील ५७ जागांवर राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. या सर्व ५७ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होत आहे. ५७ राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ २१ जून ते १ ऑगस्ट यादरम्यान संपत आहे. राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तयारी सुरु केली आहे. ज्या महत्त्वाच्या नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यामध्ये काही दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे

Related Stories

गावठाण मिळकतींचे ड्रोनव्दारे सर्वेक्षण व भूमापन प्रकल्प यशस्वीपणे राबवा

Tousif Mujawar

देशाचा रिकव्हरी रेट 97.64 टक्क्यांवर

datta jadhav

सांगलीत चक्क तहसीलदारांच्या विरोधात साखर चोरीची तक्रार

Abhijeet Khandekar

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची हजारो इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशनसाठी योजना जाहीर

Archana Banage

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार पी. एन. पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने

Archana Banage

कोल्हापूर : सादळेतील सिध्दोबा मंदिराकडील रस्ता बंद

Archana Banage