बेळगाव उत्तर विभागातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉ. रवी पाटील यांनी शहरातील रामदेव गल्ली कार पार्किंग परिसरात आज गुरुवारी सकाळी चाय पे चर्चा आयोजिली होती.
आज शहरातील रामदेव गल्ली कार पार्किंग परिसरात बाजारपेठेतील व्यापाऱ्यांसोबत त्यांनी चाय पे चर्चेच्या माध्यमातून जनतेच्या समस्यां जाणून घेतल्या आणि त्या समस्यांचे निवारण करू व मूलभूत सुविधा तसेच विकास पर्व सुरु करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती, शंकर पाटील, शैलेश कावेडिया, महेंद्र पोरवाल, रवी चोबारी व इतर व्यापारीबंधू व नागरिक या चर्चेत सहभागी झाले होते.