मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन. भाजपची राज्यातील पहिली सहकार विभाग समिती जाहिर. साखळी मतदारसंघाला पहिला मान.
डिचोली / प्रतिनिधी
सहकार क्षेत्राला उभारी प्राप्त करून देण्यासाठी या क्षेत्रात सक्रियपणे काम करण्याची गरज आहे. केंद्र व राज्य सरकार या क्षेत्रासाठी भरपूर आशावादी आणि मदतीसाठी तत्पर आहे. मात्र लोक पुढे येत नाही. हि परिस्थिती बदलताना राज्यात सहकार क्षेत्रातून जास्तीत जास्त लोकांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी भाजप पक्षाच्या सहकार विभागाने काम करावे. असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे भाजप कार्यालयात केले.
गोवा राज्य भाजप पक्षातर्फे मतदारसंघ निहाय सहकार विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून राज्यतील सर्वप्रथम सहकार विभाग समिती साखळी मतदारसंघाची जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सर्व समिती सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. समितीच्या अध्यक्षपदी अनिल काणेकर यांची स्वागतार्ह निवड करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर गोवा राज्य भाजप सहकार विभागाचे अध्यक्ष पांडुरंग कुट्टीकर, दक्षिण गोवा अध्यक्ष साळू भगत, नगरसेवक आनंद काणेकर, नगरसेविका शुभदा सवईकर, रश्मी देसाई, दयानंद बोर्येकर आदींची उपस्थिती होती.
राज्य सहकार विभागाचे अध्यक्ष पांडुरंग कुट्टीकर यांनी यावेळी साखळी मतदारसंघाची समिती जाहिर केली. अध्यक्ष म्हणून अनिल काणेकर यांची घोषणा करण्यात आली. तर या समितीवर रघुदास तारी, गजानन शेटय़े, संजय अवखळे, आनंद फडते, किशोर भावे, देवानंद गावस, उदय काणेकर, बाबला मळीक, प्रकाश फोंडेकर, चंद्रकांत घाडी, विनायक बेतकीकर, प्रियंका बायेकर, निरज गावस, माया नाईक, जगन्नाथ परब, दिया सावंत, अंजली गावस, निलेश एकावडे, यवन फाळकर, दिक्षा साखळकर, शर्मिला मळीक, वासू गावकर, उल्हास नार्वेकर, सिध्देश आरोंदेकर यांच्या नावांचीही घोषणा केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन केले. पांडुरंग कुट्टीकर यांचेही स्वागतपर भाषण झाले. सूत्रसंचालन गजानन शेटय़े यांनी केले तर आभार साळू भगत यांनी मानले.