Tarun Bharat

Sangli Breaking : भाजप नगरसेवकावर भरदिवसा गोळीबार; डोक्यात दगड घालून केली हत्या, सांगली हादरलं

सांगलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जत तालुक्यामध्ये भाजपा नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीतर डोक्यात सुद्धा दगड घातला. विजय ताड असं भाजप नगरसेवकाचे नाव आहे. ताड यांची इनोव्हा गाडी अडवून अज्ञातांनी ताड यांच्यावर आधी गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर डोक्यात दगड घातला. जत मधल्या सांगोला रोडवरील अल्फोंसो स्कूलजवळ ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जत नगरपालिकेचे भाजपचे नगरसेवक विजय ताड यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडून ताड यांची हत्या केली आहे. नगरसेवक ताड हे आपल्या इनोव्हा गाडीतून सांगोला रोडवरील असणाऱ्या स्कूल या ठिकाणी आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले होते. अल्फान्सो स्कूलच्या जवळ पोहोचले असता ताड यांचा पाठलाग करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांनी ताडे यांची ईनोवा गाडी अडवली आणि त्यांच्या गाडीवर हल्ला करत ताड यांच्यावर थेट गोळ्या झाडल्या. त्यानंतर डोक्यात दगड घालण्यात आला आहे, ज्यामध्ये ताड यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे जत शहरासह जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून आणि कोण्ही केला आहे हे मात्र समजू शकले नाही,या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आहे. तसेच ताड समर्थकांनी या ठिकाणी मोठे गर्दी केली आहे, तर घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली देखील जतकडे रवाना झाले आहेत. खुनाचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. पोलीस अधिक तपास करत आहे.

Related Stories

फडणवीसांवर टीका करताना कॉंग्रेस खासदाराची जीभ घसरली; म्हणाले, मंत्रीमंडळात भ्रष्टाचारी…

Abhijeet Khandekar

पाकिस्तान : कराचीजवळ प्रवासी विमान कोसळले

datta jadhav

इजिप्तमध्ये सापडल्या 27 प्राचीन शवपेट्या

datta jadhav

कोल्हापूर भाजपमध्ये अंतर्गत वाद? महिला पदाधिकाऱ्यांची चंद्रकांत पाटलांकडे तक्रार

datta jadhav

सांगली जिल्ह्यात नवे 936 रूग्ण, तर 754 कोरोनामुक्त

Archana Banage

खारेपाटण काजीर्डे मतदान केंद्रावरील मशीन पडले बंद

Anuja Kudatarkar