Tarun Bharat

केरळमध्ये ख्रिश्चन मतदारांना भाजपची साद

Advertisements

भाजप अध्यक्षांनी घेतली कॅथोलिक पाद्रींची भेट : नव्या संघटनेवर चर्चा

वृत्तसंस्था /तिरुअनंतपुरम

केरळमध्ये भाजप एका वेगळय़ा रणनीतिअंतर्गत स्वतःसाठी राजकीय स्थान निर्माण करू पाहत आहे. पक्षावर हिंदुत्ववादी असण्याचा शिक्का विरोधकांकडून मारला जात असताना पक्षाने आता ख्रिश्चन धर्मीयांना सोबत घेण्याचे प्रयत्न चालविले आहेत. भाजप केरळमधील ख्रिश्चन संघटनांदरम्यान इस्लामिक विचारसरणीच्या विरोधात निर्माण होत असलेल्या नाराजीचा लाभ मिळवू पाहत आहे.

भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा अलिकडेच कोट्टायम जिल्ह्य़ातील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी पोहोचले होते.  यादरम्यान त्यांनी कॅथोलिक आर्चबिशप मॅथ्यू मूलक्कट आणि चंगनस्सेरीचे मेट्रोपॉलिटन आर्चबिशप जोसेफ पेरुमथोट्टम यांची भेट घेतली होती. या दोघांनाही केरळमधील आघाडीचे कॅथोलिक पाद्री मानले जाते.

नार्कोटिक्स जिहाद

या पाद्रींसोबतच्या बैठकीत सामाजिक-राजकीय संघटना उभी करण्यावर चर्चा झाल्याचे समजते. याच्यामाध्यमातून चर्च अन् भाजपमधील अंतर मिटविण्यात येणार आहे. केरळमध्ये लव्ह जिहाद प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना अन् ख्रिश्चन धर्मीयांचा विचार एकच असल्याचे भाजप नेत्यांचे मानणे आहे. काही पाद्रींनी राज्यात ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्कोटिक्स जिहाद’ सुरू असल्याचा आरोप केला आहे.

थालस्सेरी आर्चबिशप जोसेफ पाम्पलानी यांनी सर्व चर्चेसना एक पत्र पाठविले होते. काही कट्टरवादी समूह ख्रिश्चन मुलींना जाळय़ात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचा इशारा या पत्रातून देण्यात आला होता. ख्रिस्तियन असोसिएशन आणि अलायन्स फॉर सोशल ऍक्शनने (कासा) एप्रिलमध्ये आयोजित एका सभेत ‘लव्ह जिहाद’विरोधात आवाज उठविला होता. कासाचे काही सदस्य भाजपमध्येही सक्रीय आहेत. परंतु कासाने आतापर्यंत अधिकृतपणे भाजपसोबतच्या संबंधांची घोषणा केलेली नाही.

ख्रिश्चनधर्मीय नेते आकर्षित

बैठकीत पाद्रींनी नड्डा यांना अलिकडेच झालेल्या एका अन्य बैठकीबद्दल माहिती दिली. कोची येथे ख्रिश्चनधर्मीय नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत अनेक माजी आमदार तसेच मंत्री सामील झाले होते. या बैठकीला भारतीय ख्रिस्तियन संघम नाव देण्यात आले होते. याच्याशी निगडित अनेक लोक आता भाजपसोबत जोडले जाण्याची इच्छा बाळगून आहेत. केरळमध्ये ख्रिश्चन समुदायाचे प्रमाण 18.38 टक्के आहे.

Related Stories

मूळ मुद्द्यांवर चर्चा झाली असती, तर चांगलं झालं असतं? : पंतप्रधान मोदी

Archana Banage

इस्रोने रचला नवा इतिहास! पहिल्या खासगी रॉकेटच यशस्वी प्रक्षेपण

Archana Banage

पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 22 टक्के, गेल्या 24 तासात 380 रुग्ण बरे 

prashant_c

रेल्वे प्रवासात खासगी क्षेत्राला वाव देणार

Patil_p

आयुष्यभर घातले निसर्गावर घाव…झाडाने वाचविला जीव !

Patil_p
error: Content is protected !!