Tarun Bharat

भाजप सरकारने आमदारांना मोकळेपणाने काम करण्यास द्यावे : युरी आलेमाव

Advertisements

आमदार प्रशिक्षण शिबीरावर पैशांची उधळपट्टी

प्रतिनिधी /मडगाव

आगामी विधानसभा अधिवेशनात एका प्रश्नाला केवळ पाच उप-प्रश्न विचारण्याचे बंधन घातल्यानंतर आता लोकशाहीविरोधी भाजप सरकारने आमदारांचे मन विचलीत करण्यासाठी तारांकीत प्रश्न विचारण्याचे दिवस म्हणून जाहिर केलेल्या 27 व 28 जून रोजीच भाजपशी सलग्न एका खासगी संस्थेमार्फत पंचतारांकीत हॉटेलात आमदार प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे असा गंभीर आरोप आमदार व काँग्रेसचे कार्याध्यक्ष युरी आलेमाव यांनी केला आहे.

पणजीच्या ताज व्हिवांता या पंचतारांकीत हॉटेलात ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ या संस्थेच्या सहकार्याने दोन दिवसीय शिबीराचे आयोजन केल्याचे निमंत्रण विधीमंडळ सचिवालयाने मला पाठविले आहे. गोवा विधानसभा संकुलात सर्व सुविधा उपलब्ध असताना पंचतारांकीत हॉटेलात हे शिबीर का असा सवाल युरी आलेमाव यांनी केला आहे व पैशांची उढळपट्टी करण्याच्या भाजपच्या धोरणाचाच हा भाग असल्याचे म्हटले आहे.

शिबीराला खास वक्ते म्हणुन निमंत्रीत केलेल्यांची नावे वाचल्यानंतर भाजपशी संबधीत लोकांनाच आमंत्रित केल्याचे स्पष्ट होत असुन,  केवळ आपल्या धोरणांचा उदो-उदो करण्यासाठी भाजप आज प्रत्येक संधीचा फायदा उठवीत आहे. आमदार प्रशिक्षण शिबीरासाठी नेमलेली संस्था भाजपचे धोरणच राबवीते हे सर्वज्ञात असल्याचे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

आगामी विधानसभा अधिवेशनात पर्यटन, वाहतुक, पंचायत, माहिती तंत्रज्ञान अशा महत्वाच्या खात्यांवर प्रश्न विचारण्यासाठी आज सोमवार दि. 27 जूनची तारीख असून 28 जूनला सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, महसुल, रोजगार अशा खात्यांवर तिसऱया फेरीतील प्रश्न विचारण्याची तारीख ठरली आहे. त्यामुळे तारांकीत प्रश्न सोडून प्रशिक्षण शिबीराला आमदारांनी उपस्थित रहावे अशी सभापती रमेश तवडकरांची अपेक्षा आहे का असा सवालही युरी आलेमाव यांनी उपस्थित केला आहे.

सरकारने सदर प्रशिक्षण शिबीर सुट्टीच्या दिवशी व एखाद्या रविवारी आयोजित करुन, आता नवीन आमदारांसाठी गरजेचे असलेल्या कामकाज नियमांशी संबधीत विषयांवरच माहिती द्यावी अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे. 8 ते 10 जून रोजी विधानसभा संकुलात आयोजित केलेले प्रशिक्षण शिबीर सरकारने घाईगडबडीत गुंडाळले होते यावरुनच सरकारला पंचतारांकीत हॉटेलात वायफळ खर्च करुन हे शिबीर आयोजित करायचे होते हे आता उघड झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

महिला आरक्षणावर स्पष्टीकरण द्या

Amit Kulkarni

दुचाक्या चोरणारा जेरबंदः 6.5 लाखांच्या दुचाक्या जप्त

Amit Kulkarni

सध्या पारंपरिक उपक्रम म्हणजे तारेवरची कसरत

Amit Kulkarni

प्रो. फुटबॉलमध्ये पिछाडीवरून वास्कोची एफसी गोवावर मात

Amit Kulkarni

नवे बाधित 2030, बळी 52

Amit Kulkarni

काँग्रेस उमेदवारांनी घेतली देवी महालक्ष्मीची शपथ

Patil_p
error: Content is protected !!