प्रथम तेरा गावातील लोकांची होणार आरोग्य तपासणी
सांखळी/ प्रतिनिधी
सरवायकल कॅन्सरवर कायमस्वरूपी उपाय व तो होऊ नये यासाठी राज्यातील लोकांना मोफत लस उपलब्ध करण्याचा विचार आहे. देशाच्या इतर राज्याच्या तुलनेत गोव्यात स्तन कर्करोगाचे प्रमाण अधिक असून याची कारणे शोधून त्यावर उपाय करण्यासाठी सरकार सर्व ती खबरदारी घेत आहे भाजप हा सेवा कार्याशी निगडित पक्ष असून केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नाही तर सतत जनसेवेचे व्रत घेऊन कार्यरत असणारा पक्ष आहे त्यामुळे भाजप मेडिकल सेलतर्फे कर्करोग निदान शिबिरांचे गावागावात आयोजन करून मोफत सेवा देताना सामाजिक बांधिलकी जपत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले
भाजप मेडिकल सेलतर्फे युवराज सिंग फाऊंडेशन व सांखळी भाजपच्या सहकार्याने आयोजित मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते
तातडीने निदान करून लोकांचा जीवन सुधारणे ही संकल्पना घेऊन आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दीनदयाळ स्वास्थ्य योजना कार्डच्या माध्यमातून 100टक्के लोकांना आरोग्य सुरक्षा कवच देणारे गोवा अग्रणी राज्य असून फुकट मिळते त्याची किंमत नसते मात्र हे कार्ड हजारो लोकांना मोठा आधार बनलेले असून ते तुम्ही जसे दागिने कपाटात ठेवता तसे सुरक्षित ठेवा असे आवाहन मुख्यमंत्र्यानी केले
आरोग्य शिक्षण सहकार संस्कृती आदी चौफेर क्षेत्रात भाजप नियमित कार्यरत असून जनतेशी आपुलकीचे नाते जोडून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होताना प्रत्येक घरात समृद्धी हा ध्यास आहे. आरोग्य शिबिर राज्यातील सर्व विभागात घेतली जाणार असून त्याचा महिला पुरुष व लोकांनी लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.
भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी भाजप आरोग्य सेल तर्फे आरोग्य सेवेसाठी सर्व ती खबरदारी जागृती केली जात असून राज्यातील प्रत्येक बालकाची व माणसाची आम्हाला काळजी आहे त्यामुळे या शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले
डॉ. शेखर साळकर यांनी ब्रेस्ट कॅन्सर तसेच इतर कॅन्सर व विविध आजार या बाबत जागृती केली यावेळी सरपंच महेंद्र एकावडे,जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्ल करव डॉक्टर्स टीम उपस्थित होती.
प्रथम तेरा गावातील लोकांची होणार आरोग्य तपासणी
गोवा भाजपतर्फे आयोजित आरोग्य शिबिराचे आज कुडणे गावातून सुरवात झाली असून 25 मे ते 7 जून या कालावधीत सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत हे शिबीर चालणार आहे. सावर्डे, आमोना, काले, वेळगे, सुर्ल,मोले, पाळी, साकोर्ड, न्हावेली धारबादोडा,दाबाळ किर्लपाल. वरील गावात हे आरोग्य शिबिर होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.