तरुण भारत

आज बोलणाऱ्यांनी तोंड बंद करावीत, आशिष शेलारांचे राऊतांना जाहीर आव्हान

मुंबई- “संजय राऊत तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर स्वप्नदोष झाल्याचा आरोप करत असाल तर शिवसेनेच्या नेत्यांना बुद्धीदोष झाला आहे. या बुद्धीदोषाचे उत्तर ठाण्याला आहे. तिथे संजय राऊत यांनी जाऊन यावे,” असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“बाबरी मशीद हे आंदोलन साधू संतानी, हिंदू समाजाने सुरु केल्याचे अख्ख्या जगाला माहिती आहे. तुमचा जन्मच १९६० नंतरचा आहे. हे आंदोलन त्याआधी सुरु झाले. जन्म होण्याआधी मी कारसेवेला होतो म्हणणाऱ्यांनी आधी आत्मपरिक्षण करावं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद ही नावं तरी माहिती आहेत का? उगाच श्रेय घेण्याच्या भानडीत पडू नका. आज बोलणाऱ्यांनी तोंड बंद करावीत,” असे थेट आव्हान आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना दिले आहे.

Advertisements

“हनुमान चालिसाचा विषय भाजपाचा नाही. पेट्रोलच्या विषयावर भाजपानेच काम केले आहे. भाजपाच्या सरकारने देशात पेट्रोलच्या करात सवलत दिली आहे. याची पंतप्रधांनी आठवण करुन दिली मग त्यावरून पळ का काढता? काँग्रेस त्यावेळी आंदोलन करत होती. मग त्यांनी आता स्वतःच्या सरकारला सांगावे की कर कमी करावे. जगामध्ये युद्ध सुरु असतानाही कोणत्याही दबावाला बळी न पडता पंतप्रधानांनी रशियाकडून क्रुड ऑईल घेतले. त्याबद्दल तुम्ही एकतरी वाक्य काढलं का? तुमच्या डोक्यात राजकारणाची घाण आहे ती आधी साफ करा,” असेही आशिष शेलार म्हणाले.

Related Stories

गोकुळ शिरगाव येथील बारा वर्षाच्या मुलीचे अपहरण

Abhijeet Shinde

कोल्हापूर : बिगरशेतीची बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या एकास अटक

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात मागील 24 तासात 5,859 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

राजू शेट्टी चालले महाविकास आघाडीपासून दूर

Abhijeet Shinde

अजिंक्यताऱ्याच्या साक्षीने रेकॉर्ड अजिंक्य

Patil_p

मिरज : रोझावाडी येथील माजी उपसरपंचाचा कोरोनाने मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!