Tarun Bharat

पोलीस आयुक्तांनी माझी खोटी सही केली का?; सोमय्या तक्रार करण्यासाठी खार पोलीस स्थानकात

ऑनलाईन टीम/तरुण भारत

किरीट सोमय्यांनी (kirit somaiya) मुंबई पोलिसांवर (Mumbi police) गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरवर (FIR)खोटी असून त्यावरील सही सुद्धा खोटी असल्याचे म्हंटले आहे. तसेच किरीट सोमय्या याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी खार पोलीस स्थानकात (khar police station) गेले आहेत. ते यावेळी याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार आहेत.

सोमय्या यांनी म्हटलं आहे की, पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर खोटी आहे. त्यावरील सही सुद्धा माझी नाही. त्यामुळे याविरोधात पोलिसात तक्रार करून या खोट्या एफआयआर विरोधात चौकशी करण्याची मागणी करणार आहे. तर याविरोधात तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या खार पोलीस स्थानकात पोहोचले आहेत. त्यांनी, ‘त्या एफआरआयवर मी सही केलेली नाही. त्या एफआयआरवरील सही बनावट असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. राज्य सरकारने बनावट एफआयआर दाखल केली असून सरकारची बनवाबनवी पकडली गेली आहे’, असंही सोमय्या म्हणाले आहेत.

यावेळी किरीट सोमय्या यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे (sanjay pande) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दाखल करण्यात आलेली एफआयआर चुकीची असून त्यावर माझी स्वाक्षरी नाही, पोलीस आयुक्तांनी माझी खोटी सही केली का असा प्रश्न सोमय्या यांनी यावेळी केला आहे. याविरोधात आपण खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे. माझ्या नावावने बोगस एफआयआर दाखल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली आहे. सोमय्या खार पोलीस स्थानकात दाखल झाले असून ते बरच वेळ झालं ते पोलीस थकत आहेत.

Related Stories

काळजी घेतली तर दुसरी लाट येणार नाही – ना.शंभूराज देसाई

Archana Banage

5 फेब्रुवारीला होणाऱ्या हिंदू- जन आक्रोश सभेचे चित्रिकरण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Abhijeet Khandekar

पंजाब : जालंधरमध्ये आजपासून नाईट कर्फ्यू

Tousif Mujawar

आरोग्यनोंदींच्या डिजिटायझेशनसाठी केंद्राचे नवीन मिशन

Abhijeet Khandekar

अमोल मिटकरी यांनी धिरेंद्र शास्त्रींना दिले ‘हे’ आव्हान

Abhijeet Khandekar

गुंतवणुकीच्या नावाखाली महिलेकडून महिलेची फसवणूक

Patil_p