खानापूर : शनिवारी एम. के. हुबळी येथे भाजपच्या विजय संकल्प यात्रेनिमित्ताने सभेला संबोधित करण्यासाठी अमित शहा उपस्थित होते. यावेळी खानापूर तालुका भाजपचे नेते महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. यावेळी त्यांनी खानापूर तालुक्dयातील भाजपच्या संघटनेबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात सुरू असलेल्या कामकाजासंदर्भात तसेच भाजपच्या विविध उपक्रमाबाबत सविस्तर चर्चा केली. तालुक्यात भाजप वातावरण निर्मितीत आघाडीवर असून या वेळेला तालुक्यात भाजपचा झेंडा निश्चित फडकणार असल्याचे विठ्ठल हलगेकर यांनी अमित शहा यांना सांगितले. यावेळी अमित शहांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. विठ्ठल हलगेकरांसोबत राज्याध्यक्ष नलीनकुमार कटील, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजपच्या नेत्या सोनाली सरनोबत यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleमहिलांनाही अधिकार देण्याचे काम काँग्रेसचेच
Next Article कारवारात लढाऊ विमान संग्रहालयाची पायाभरणी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.