ऑनलाईन टीम/तरुण भारत
तेलंगणात भाजप आमदार टी. राजा सिंह (T. Raja Singh) यांना अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. तेव्हापासून लोक संतप्त झाले होते. हैदराबादमध्ये मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यानंतर आज सकाळी हैदराबाद येथून त्याला अटक करण्यात आली.
टी. राजा सिंह यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल त्याच्यावर अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर डबीरपुरा, भवानीनगर, रेनबाजार, मीर चौक पोलीस ठाण्यांबाहेर मोठ्या संख्येने लोक तक्रारी दाखल करण्यासाठी आले होते. एका समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने लोक संतप्त झाले असून टी. राजा सिंह यांच्या अटकेची मागणी केला होती.


दरम्यान, टी. राजा यांनी नुकताच एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाष्य केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पोलीस आयुक्त सी. व्ही. आनंद यांच्या कार्यालयासमोर आणि शहरातील अनेक भागात निदर्शने सुरू झाली. त्याच्या अटकेच्या मागणीवर आंदोलक ठाम होते. या व्हिडिओमध्ये टी. राजा यांनी कॉमेडियन मुनव्वर फारुकी आणि त्याच्या आईवरही भाष्य केले आहे.
हे ही वाचा : भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे गोव्यात निधन
आमदार राजा सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांनी सांगितले की, राजासिंह एका समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आमदाराविरुद्ध तीव्र आक्रोश व्यक्त केला जात आहे. तसेच त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली जात आहे. सोमवारी रात्री पोलीस कमिश्नन सी.व्ही. आनंद यांचे कार्यालय आणि शहराच्या इतर भागांमध्ये आंदोलन सुरू झाले. या व्हिडीओमध्ये राजा सिंह हे कॉमेडियन मुनव्वर फारुखी आणि त्याच्या आईबाबतही टिप्पणी करताना दिसत आहेत. त्यामुळे संतप्त लोकांनी आंदोलन करत त्यांच्या अटकेची मागणी केली होती.