आगामी निवडणुकांसंबंधी रणनीती ठरणार ः पक्षांतर्गत फेरबदलांवर शिक्कामोर्तब अपेक्षित
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 16-17 जानेवारीला होणार आहे. या आगामी काळात होणाऱया निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीत रणनीती बनवणे आणि सरकारचे यश सार्वजनिक करणे यावर भर असणार आहे. त्यासंदर्भात पक्षाच्या मुख्यालयात सुरू असलेली तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीत वरिष्ठ नेत्यांसह 350 कार्यकारिणी सदस्य सहभागी होणार आहेत. बैठकीपूर्वी संसद मार्गावर पंतप्रधानांचा रोड शोही प्रस्तावित आहे. यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी वाहतूक नियमावली जारी केली आहे.
यावषी 10 राज्यांमध्ये होणाऱया विधानसभा निवडणुका आणि पुढीलवषी होणाऱया लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. निवडणूक राज्यांची रणनीती ठरविणे आणि मोदी सरकारचे यश जनतेपर्यंत नेण्याचे मार्ग निश्चित करणे हे सोमवारपासून सुरू होत असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीचा मुख्य अजेंडा असणार आहे. तसेच लोकसभेच्या कमकुवत समजल्या जाणाऱया 160 जागांच्या तयारीबाबतही चर्चा होण्याची शक्मयता आहे.
एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये दुपारी 4 वाजता भाजप कार्यकारिणीची बैठक होणार असून त्यात पंतप्रधान मोदीही सहभागी होणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात होणार असून या दोन दिवसीय बैठकीची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने मंगळवार, 17 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता होण्याची शक्मयता आहे. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि पक्षाचे इतर अनेक नेतेही महत्त्वाच्या प्रस्तावांवर बोलू शकतात.
पंतप्रधान करणार मार्गदर्शन
पक्षाच्या अजेंडय़ांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत दिलेले भाषण आकर्षणाचे केंद्र ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कार्यकारिणी बैठकीच्या दुसऱया आणि शेवटच्या दिवशी मंगळवार 17 जानेवारी रोजी आपल्या समापन भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील भाजप नेत्यांना आगामी विधानसभा निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आवाहन करतील. तसेच जी-20 च्या अध्यक्षतेशी संबंधित कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त लोकसहभाग सुनिश्चित करण्यासाठी आवाहन करतील, अशी अपेक्षा आहे.
जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ वाढणार?
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर केला जाऊ शकतो. याशिवाय मोदी सरकारने विविध क्षेत्रात केलेले यश आणि भारताला दिलेले जी-20 चे अध्यक्षपद यासंबंधीचे ठरावही कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर केले जाऊ शकतात. कार्यकारिणी बैठकीच्या अजेंडय़ामध्ये संघटनात्मक आणि समकालीन विषयांवर चर्चा तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा समावेश आहे. बैठकीत हैदराबाद येथे झालेल्या मागील बैठकीपासूनचे प्रमुख उपक्रम व कार्यक्रमांचा अहवाल ठेवण्यात येणार असून आगामी कार्यक्रम व रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह आणि बी. एल. संतोष यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मोदी सरकारचे मंत्री, सर्व राष्ट्रीय नेते उपस्थित असतील. तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय कार्यकारिणीतील सर्व नेत्यांचा समावेश असेल.