Tarun Bharat

कनेडीत भाजपा पदाधिकारी व शिवसैनिकात राडा

BJP officials in Kennedy and Rada in Shiv Sainik

परिसरातील वातावरण तणावसदृश्य

पोलिसांची घटनास्थळी धाव

तालुक्यातील नेहमीच चर्चेत असलेल्या व आपल्या डॅशिंग कार्यपद्धतीमुळे प्रसिद्ध असलेल्या भाजपा पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये कनेडी येथे जोरदार राडा झाल्याचे समजते. त्या पदाधिकाऱ्याने एका कार्यकर्त्याला मारहाण केल्यावरून जाब विचारण्यासाठी या कार्यकर्त्याचे समर्थक त्या पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात घुसले. यावेळी एकमेकांना जोरदार धक्काबुक्की झाल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते या कार्यालय परिसरात गोळा झाले आहेत. तसेच पोलिसांना माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. अद्याप पोलिसात कोणतीही तक्रार दाखल नसली तरीही परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.या राड्यामध्ये कुंभवडे येथील शिवसेनेचे सरपंच सूर्यकांत उर्फ आप्पा तावडे हे जखमी झाले आहेत.

कनेडी / वार्ताहर

Related Stories

गुजरात : अमरेली, राजकोटमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

समीर वानखेडेंना दणका; नवी मुंबईतील बारचा परवाना रद्द

datta jadhav

पोलीस कुटुंबातील महिलांनी घेतला तणावमुक्त जीवनाचा आनंद

NIKHIL_N

ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ल्यातील काही गावांना स्थलांतराच्या नोटीसा

Anuja Kudatarkar

प्रचाराच्या तोफा थंडावल्या !आता लक्ष रविवारकडे

Anuja Kudatarkar

चेन्नईमध्ये आणखी 12 दिवस वाढवले लॉक डाऊन

Tousif Mujawar