BJP officials in Sindhudurg district in active mode
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी ऍक्टिव्ह मोडमध्ये आहेत सावंतवाडी तालुक्यात 52 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत या सर्व ग्रामपंचायत मध्ये भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवावी आम्ही निश्चित यश मिळवू असे सावंतवाडी तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ठरवले आहे . त्यामुळे भाजपच्या गावातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या या स्वतंत्र निवडणूक लढवण्याची मागणी प्रदेश स्तरावरील नेत्यांच्या कानी घातली जाईल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी सह सर्वच खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपने एक हाती सत्ता आणली आहे . त्यामुळे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून आता या पुढच्या सर्व निवडणुका भाजप जिंकेल अशी भावना विरोधकांमध्ये झाली आहे त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मळगाव येथे दिली ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची सावंतवाडी तालुका पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक मळगाव येथील प्रभावती हॉलमध्ये आज घेण्यात आली या बैठकीत मोठ्या प्रमाणात भाजपचे तालुकास्तरावरील व गावातील पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावंतवाडी / प्रतिनिधी