BJP Parliamentary Board: भाजपने केंद्रीय संसदीय मंडळाची स्थापना केली आहे. यामध्ये त्यांनी मोठा बदल केला आहे. यांमध्ये महाराष्ट्राला संधी न देता कर्नाटकातील मंत्र्यांचा समावेश करण्य़ात आला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजपच्या संसदीय बोर्डात समावेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. दरम्यान, त्यांची निवड दुसऱ्या महत्त्वाच्या अशा निवडणूक समितीत करण्यात आली आहे. तर संसदीय बोर्डातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डावलले आहे.
संसदीय बोर्डात एकूण ११ सदस्यांचा समावेश आहे. यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हेच अध्य़क्ष आहेत. त्यांच्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, येडियुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के. लक्ष्मण, इक्बाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया यांचा समावेश आहे. तर पक्षाचे संघटन महामंत्री बीएल संतोष यांनाही सदस्य करण्यात आले आहे.
दोन आठवड्यापूर्वी नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी म्हटलं होतं की, मला खूप वेळा राजकारण सोडावसं असं वाटतं, आयुष्यात राजकारण सोडता अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. तसेच राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आलीय असंही ते म्हणाले होते.


previous post