शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे जेव्हा आमदारांना घेऊन परत येतील तेव्हा बंडखोर आमदारांच्या स्वागतासाठी तयारीत राहण्याचे निर्देश भाजपाने दिले असल्याचे इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात सुत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे.काल (ता.27 ) भाजपाच्या सुकाणू समितीतील नेत्यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बंडखोर आमदार परत आल्यास त्यांच्या स्वागतासाठी भाजपा कार्यकर्त्यांना तयार राहण्यासंदर्भातील निर्देश दिला जाण्यासंदर्भातील चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कोणती राजकीय खेळी करायची, हे भाजपा ठरविणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
शिवसेनेच्या बंडखोरआमदारांना भाजप मदत करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. मात्र भाजपने या संदर्भात कोणतीच भूमिका घेतलेली नाही.शिंदे गटाचे बंड हे शिवसेनेतील अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत भाजपाने आतापर्यंत सांगितले आहे. काल सुप्रिम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर मात्र भाजपच्या नेत्य़ांनी बोलण्यास सुरुवात केली आहे. बंडखोरांची आमदारकी वाचविण्यासाठी सरकारविरोधात स्वत:हून अविश्वास ठराव भाजपाकडून मांडला जाणार नाही. गेल्या काही दिवसांमध्ये घडत असलेल्या राजकीय घटनांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. भाजपाने थांबा आणि वाट पहा अशी भूमिका सध्या घेतली असल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी आमच्या बैठकीत चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान चंद्रकांत दादांनी आमचा यात काही संबंध नाही. तो शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे. मी काही बोलणार नाही असे ते म्हणाले. एवढेच नाही तर कोर्टाच्या निर्णयावरही त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळली.


previous post