Tarun Bharat

राज्यसभेचा भाजपचा दुसरा उमेदवार कोल्हापूरचा?

ऑनलाईन टीम/तरुण भारत

राज्यसभेच्या (Rajya Sabha) सहाव्या जागेवरुन सुरु असलेल्या चर्चांना अखेर शिवसेनेने (shivsena) पूर्णविराम दिला आहे. शिवसेना संभाजीराजे छत्रपतींना (sambhajiraje chhatrapati) उमेदवारी देणार की नाही यावर तर्क-वितर्क लढवले जात असताना अखेर कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पवार (sanjay pawar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. तर शिवसेनेच्या पाठोपाठ भाजप ही आपला दुसरा उमेदवार कोल्हापूरच देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून संभाजीराजे छत्रपती मैदानात उतरणात आहेत. त्यांनी महाविकास आघाडीकडे पाठिंबाही मागितला होता. पण शिवसेनेने सेनेत प्रवेश करा त्यानंतरच उमेदवारी देऊ असा पवित्र घेतल्याने आणि संभाजीराजे यांनी शिवसेनेची ही ऑफर नाकारल्याने अखेर शिवसेनेने कोल्हापूर शिवसेना जिल्हा अध्यक्ष संजय पवार यांना उमेदवारी देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे संभाजीराजे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना भाजपनेही आपला दुसरा उमेदवार कोल्हापूरचा असेल यासाठी धनंजय महाडिक यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.

भाजपने राज्यसभेसाठी पहिले उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री पियूष गोयल (piyush goyal) यांचे नाव जवळपास निश्चित केले आहे. तर भाजपचे दुसरे उमेदवार म्हणून धनंजय महाडिक (dhananjaya mahadik) यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती भाजपमधील विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. तसेच तिसरा उमेदवार द्यायचा की नाही, याबद्दल अजून चर्चा सुरू आहे. मतांची गोळा बेरीज करून तिसऱ्या जागेवर निर्णय घेतला जाणार आहे. तिसऱ्या जागेसाठी भाजपला १३ मते कमी पडत आहे. पण, भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी लागणाऱ्या मतांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपकडे ११३ आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे १०६ आमदार, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदार अशा एकूण ११३ आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी ४२ मतांची गरज आहे. भाजपला फक्त १३ मतांची गरज आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आगामी महापालिका, जिल्हा परिषद, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधला असून धनंजय महाडिक यांच्याकडे ती कामगिरी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपला मजबूत करण्यासाठी धनंजय महाडिक एक चांगला पर्याय असल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

वारणा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. डी. टी. शिर्के यांचा कुलगुरूपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

Archana Banage

दिल्लीत 31 मेपासून सुरु होणार अनलॉक प्रक्रिया : अरविंद केजरीवाल

Tousif Mujawar

बनावट जमिन वाटप आदेशप्रकरणी बैठक घ्या

Archana Banage

सुप्रिया सुळेंनी ‘या’ कारणासाठी निर्मला सीतारमण यांचे केले अभिनंदन

Archana Banage

टायगर-दिशा संबंधी मुंबई पोलिसांच्या ‘त्या’ ट्वीटची सोशल मीडियावर चर्चा

Archana Banage

सीबीएसई, आयसीएसईच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द : सर्वोच्च न्यायालय

Tousif Mujawar