प्रतिनिधी /पणजी
आगामी लोकसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी भाजप राज्य कार्यकारिणीत तीन नेत्यांचा पदाधिकारी म्हणून समावेश केला आहे.
भाजपच्या राज्य पदाधिकाऱयांची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयात झाली असता त्यात माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांची उपाध्यक्षपदी तर माजी आमदार दयानंद सोपटे आणि जयेश साळगावकर यांची सचिवपदी नियुक्ती केली आहे. भाजपच्या या बैठकीत आतापर्यंत राज्यपातळीवर घेतलेल्या बैठका व सभांचा आढावा घेतला व पदाधिकाऱयांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज रहा. आतापासून कामाला लागा. दोन्ही जागांवर भाजपला घवघवीत यश संपादन करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवा, असे सल्ले मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी दिले.