Tarun Bharat

कराडमध्ये भाजपची तिरंगा रॅली उत्साहात

Advertisements

कराड /प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कराड शहर व कराड दक्षिण, उत्तर भाजपच्या वतीने आज तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे व डॉ. अतुल भोसले यांच्यासह शहर व तालुक्यातून बहुतांश पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते

तिरंगा रॅली येथील हुतात्मा स्मारकास अभिवादन करून सुरू झाली. दत्त चौक, आझाद चौक, नेहरू चौक मार्गे ही रॅली कमानी मारुती, पांढरीचा मारुती चौकातून विजय दिवस चौकामार्गे दत्त चौकातून कार्वेनाका या ठिकाणी आली. यावेळी भारत माता की जय…वंदे मातरम… अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यानंतर या रॅलीचे रूपांतर सभेत झाले. 

डॉ. अतुल भोसले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरंगा अभियान संपूर्ण देशात राबवून जगात भारताचा स्वाभिमान उंचावला आहे. देश स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांचे स्मरण यानिमित्ताने संपूर्ण देशात केले जात आहे. पुढच्या पिढीला यानिमित्ताने याबाबत माहिती होण्यास मदत होणार आहे.

जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. देशप्रेम जागृत व्हावे. नव्या पिढीला देश स्वातंत्र्याबद्दल अधिक माहिती व्हावी तसेच देश स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी आपले बलिदान दिले त्यांचे स्मरण व्हावे हा मुख्य उद्देश या संकल्पनेतून साकार होणार आहे. या संकल्पनेला संपूर्ण देशभरातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. मी स्वतः कराड, सातारा व वाईसह संपूर्ण जिह्यातून अशा रॅलीतून सहभागी होत आहे.

Related Stories

अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा ; चंद्रकांत पाटील यांचं थेट अमित शाहांना पत्र

Abhijeet Shinde

तटबंदी, बुरूज ढासळल्याने पन्हाळगडाचे अस्तित्व धोक्यात

Abhijeet Shinde

लवकरच कोल्हापूर झेडपीच्या निवडणुका! ‘हा’ कार्यक्रम झाला जाहीर

Rahul Gadkar

मुख्यमंत्रीपद 5 वर्ष शिवसेनेकडेच

datta jadhav

गोपीचंद पडळकरांना साताऱ्यात फिरकू देणार नाही

Abhijeet Shinde

सांगलीतील ‘त्या’ खुनाचा सहा तासात लावला छडा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!