Tarun Bharat

भाजपला राज्यसभेसारखं यश मिळणार नाही, वडेट्टीवारांचा दावा

ऑनलाईन टीम/तरुण भरत

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर विधान परिषदेची निवडणूक (legislative council election) लागली आहे. भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी mahavikas aghadi) तयारीला लागले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत (rajyasabha election) शिवसेनेच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागल्याने राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांनी सावध पवित्र घेत हालचाली सुरु केल्या आहेत. तर भाजपने विधानपरिषदेच्या निवडणुकीत राज्यसभेसारखं यश मिळणार असल्याचं म्हंटल आहे. तर या निवडणुकीमध्ये भाजपला पुन्हा राज्यसभेसारखं यश मिळणार नाही असा दावा काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी केला आहे.

काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये विधान परिषदवर निवडणुकीबाबत माहिती दिली. भाजपचा राज्यसभेमध्ये काही तांत्रिक गोष्टींमुळे विजय झाला आहे. मतांच्या संख्येनुसार झालेला विजय नाही. त्यांना मत पडली आणि आम्हाला पडलेल्या मतांमध्ये फरक आहे. गणितानुसार त्यांचा विजय तांत्रिक आहे. परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडे संख्याबळ नाही. भाजपला २२ मत पहिल्या पसंतीची लागतात. त्यांच्याकडे ४ उमेदवार निवडून आल्यावर पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी २२ मतांची गरज आहे. तर काँग्रेसला ८ ते १० मतांची गरज आहे. आमच्यासोबत असलेले छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार आम्हाला पाठिंबा देतील. वैचारिक द्रष्टिने आमच्यासोबत अपक्ष येतील असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

विधान परिषदेची निवडणूक गुप्त मतदानाने होते. परंतु महाविकास आघाडीला गुप्त मतदानाचा धोका नाही. एका जागेसाठी निवडणूक चुरशीची होणार आहे. या एका जागेसाठी मतदानासाठी संपर्क साधण्यात येत असेल तर त्यात काही वावगं ठरणार नाही. आमचा सहावा उमेदवार निवडून येण्यासाठी कुठेही अडचण वाटत नाही. महाविकास आघाडीला ज्यांनी समर्थन दिले आहे. ते पुन्हा आम्हाला मतदान करतील. पुढील अडीच वर्ष आमचेच सरकार आहे. असे वडेट्टीवार म्हणाले.

Related Stories

दिल्लीतील तिन्ही महापालिकांचे होणार विलीनीकरण

datta jadhav

महाराष्ट्रातील मंदीरे उघडण्यासाठी भाजपचे घंटानाद आंदोलन

Tousif Mujawar

धक्कादायक ! नर्स असल्याचे भासवून एका दिवसाच्या चिमुरड्याचे केले अपहरण; तासगावातील घटना

Abhijeet Khandekar

राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट अखेर सुरू

Tousif Mujawar

वनविभागाने वनमजुरांना कामावर घेण्याची दिली लेखी हमी

Archana Banage

पेट्रोल-डिझेल लवकरच स्वस्त होणार

Archana Banage