Tarun Bharat

भाजप कार्यकर्ते, पोलिसांमध्ये झटापट

कचरा घोटाळय़ाच्या आंदोलनावेळी महापालिकेत घुसताना वादावादी :धक्काबुक्कीचा प्रकार
अधिकारी आंदोलनस्थळी येण्यास विलंब केल्यावरून भाजप आक्रमक : तणावपूर्ण वातावरण

प्रतिनिधी/कोल्हापूर


सहा महिन्यांपूर्वी उघडकीस आणलेल्या कचरा घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करण्यात होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ भाजपने बुधवारी महापालिकेवर जोरदार निदर्शने केली. यावेळी चर्चेसाठी अधिकारी येण्यास उशीर झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांशी त्यांची झटापट झाली. वरिष्ठ अधिकाऱयासोबत वादवादी आणि धक्काबुक्कीचाही प्रकार घडल्याने वातावरण तणावपूर्ण होते.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील कचरा विनाप्रक्रिया कसबा बावडय़ातील शेतांमध्ये टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. या घोटाळ्यातील दोषी असलेला कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यावर अत्यंत जुजबी कारवाई करून प्रशासन त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत भाजपने बुधवारी महापालिकेवर निदर्शने केली. माजी नगरसेवक चंद्रकांत घाडगे, अजित ठाणेकर, राहुल चिकोडे, महेश जाधव, अशोक देसाई, विजय जाधव, विजय खाडे पाटील यांनी कचरा घोटाळ्य़ावरून प्रशासनावर सडकून टीका केली. सुमारे तासभर निदर्शने केल्यानंतर महानगरपालिकेचे कोणी अधिकारी चर्चा करण्यास आले नसल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. महानगरपालिकेत जाताना प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी त्यांना अटकाव केला. यावेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यावेळी प्रदीप उलपे, राजू मोरे, संजय सावंत, दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, विजय आगरवाल, संतोष भिवटे, दिग्विजय कालेकर, भरत काळे, विवेक कुलकर्णी, आशिष कपडेकर, अशोक जाधव आदी उपस्थित होते.

धक्काबुक्की, वादावादी आणि ठिय्या

महापालिकेत भाजप कार्यकर्ते घुसण्याचा प्रयत्न करू लागल्यानंतर पोलीस व कार्यकर्त्यांत धक्काबुक्की झाली. तसेच दोन कर्मचारी आणि भाजप पदाधिकारी यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांनी कार्यकर्त्यांशी समजूत काढली. परंतु प्रमुख पदाधिकारी आत गेल्यानंतर गेट बंद करण्याचा प्रयत्न झाल्यावर पुन्हा एकदा पोलिसांबरोबर वादावादी आणि धक्काबुक्की झाली. अखेर सर्व कार्यकर्त्यांना आत घेतले. यानंतर कार्यकर्त्यांनी मुख्य दरवाजाच्या आत ठाण मांडले.
कारवाईच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
उपायुक्त रविकांत आडसुळ यांनी दोन दिवसात बैठक घेऊ. आज गुरुवारी दुपारनंतर कचरा टाकलेल्या ठिकाणी ट्रायल पीट घेऊन कचरा उठाव करावयास लावू. निलंबनाची प्रक्रिया सुरू असलेल्या आरोग्य निरीक्षकास कसबा बावडय़ातून अन्य ठिकाणी बदली करू, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले.
महिला कार्यकर्त्यांनी बांगडय़ा फेकून प्रशासनाचा केला निषेध
सहा महिन्यापूर्वी काचरा घोटाळा उघडकीस आणूनही कारवाई होत नसल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यामध्ये महिला कार्यकर्त्यांचासही सहभाग होता. त्यांनी मनपाचा दरवाजा ढकलून आत घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडवले. काही महिलांनी हातातील बांगडय़ा गेटवरून फेकून प्रशासनाचा निषेध केला.

Advertisements

Related Stories

कोल्हापुरात साडेतीनशे महिलांना 55 लाखांची कोरोना मदत

Abhijeet Shinde

विशेष मागासवर्ग आयोग गठित करणे ही धूळफेक

Sumit Tambekar

पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर अद्याप साडे तीन फूट पाणी

Abhijeet Shinde

कोल्हापूर :वाचनालयाला अर्थसाह्य करण्यासाठी प्रयत्न करणार : अशोकराव माने

Abhijeet Shinde

सावर्डे येथील दत्त व शिवक्रांती सहकारी संस्थेत ९७ लाखांचा घोटाळा

Abhijeet Shinde

शिवाजी विद्यापीठ नॅक ए प्लस’ मानांकनाच्या तयारीत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!