Tarun Bharat

एकनाथ शिंदेंना भाजपची मोठी ऑफर? किती मंत्रिपद देणार?

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर जवळपास 46 आमदार शिंदे यांच्या गोटात सामील झाले आहेत. भाजप आणि शिंदे गट मिळून सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा सुरू आहे. यातच भाजपने (BJP) शिंदे गटाला मोठी ऑफर दिली आहे. यामध्ये राज्यात ८ कॅबिनेट मंत्रीपद, ५ राज्य मंत्रिपद आणि केंद्रात २ मंत्रिपद देण्याची ऑफर देण्यात आलीय, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, शिंदे गटाचे संख्याबळ वाढत असतानाच आता भाजपने शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी २०१९ मध्ये स्थापन केलेल्या ८० तासांच्या सरकारमध्ये अजित पवारांना असलेली ऑफरच शिंदेंना भाजपने दिल्याची माहिती समोर येत आहे.

Related Stories

शनिवार पेठेत बर्थडे बॉयसह 12 युवकांवर गुन्हा दाखल

Patil_p

महात्मा गांधी घराघरात पोहचतील, पण उपयोग होणार नाही : चंद्रकांत पाटील

Abhijeet Shinde

लोकसभा सभापती ओम बिर्लांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

माढा तालुक्याच्या चिंतेत भर, ८ रुग्णांची वाढ

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात गुरुवारी 47,371 रुग्ण बरे होऊन घरी, तर 29,911 नवीन रुग्ण

Rohan_P

शिवराज सिंह चौहान मंत्रिमंडळाचा विस्तार, 20 कॅबिनेटसह 8 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ

Rohan_P
error: Content is protected !!