Tarun Bharat

भोंग्यांच्या बैठकीवर भाजपचा बहिष्कार, ‘हेच’ नेते अनुपस्थित राहणार

मुंबई-/ऑनलाईन- महाविकास आघाडी सरकारने आज(सोमवार) भोंग्याच्या संदर्भात आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला आजी-माजी मुख्यमंत्री अनुउपस्थित राहणार आहेत. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनुपस्थित असणार असून ही बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेत पार पडणार आहे. तसेच, या बैठकीस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील गैरहजर राहणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, ३ मे पर्यंत मनेसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगे उतरवण्याचे अल्टिमेटम दिले आहे. मात्र राज ठाकरे देखील या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. मनसेकडून यान बैठकीला मनसेचे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित राहणार आहेत. याशिवाय एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे देखील या सर्वपक्षीय बैठकीस हजर राहणार नाहीत.

Related Stories

भाजपमध्ये सर्व उपरे; शिवसेनेने केलेल्या टीकेला प्रवीण दरेकरांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

Archana Banage

जिल्हा परिषदेच्या जागा विकसित करण्यासाठी खास तरतूद

Patil_p

पुण्याचा कचरा साताऱयात कसा?

Patil_p

Parliament Monsoon Session: कोरोना विरोधातील लढाईत आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे – पीएम नरेंद्र मोदी

Archana Banage

मराठा आरक्षण: १६ जूनपासून राज्यात आंदोलन : खासदार संभाजीराजे

Archana Banage

सोलापूर : खासदार ओमराजे यांचा बार्शीतील सुर्डी गाव दत्तकचा प्रस्ताव

Archana Banage