Tarun Bharat

स्थायी सभापती निवडीत राष्ट्रवादीकडून काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम; भाजपाचे धीरज सुर्यवंशी विजयी

सांगली/प्रतिनिधी

सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्थायी सभापती पदी भाजपाचे उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन सदस्य अनुपस्थित राहीले त्यामुळे काँग्रेसने एकाकी लढत दिली. या चुरशीने झालेल्या निवडणुकीत भाजपा उमेदवार धीरज सुर्यवंशी यांना 9 तर काँग्रेस उमेदवार संतोष पाटील यांना अवघी 5 मते मिळाली. त्यामुळे सांगली महापालिकेच्या स्थायी सभापती निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करीत भाजपाचे उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा विजय झाला आहे. सभापतीपदी निवड झाल्यानंतर धीरज सुर्यवंशी यांचा आमदार सुधीर गाडगीळ, माजी आम दिनकर पाटील, दिपकबाबा शिंदे, शेखर इनामदार आदींसह भाजपा नेत्यांनी सत्कार केला.

दरम्यान, स्थायी सभापती निवडणुकीत गैरहजर राहिलेल्या त्या दोन राष्ट्रवादीच्या सदस्यांचा नेत्यांकडून शोध सुरू आहे. बुधवार दुपारपासून संपर्कात नसलेले राष्ट्रवादीचे स्थायी सदस्य संगीता हारगे आणि पवित्रा केरीपाळे हे अचानक गेले कुठे याचा आम्ही शोध घेत असून झाल्या सर्व घटनांचा नेते जयंत पाटील यांच्याकडे अहवाल सादर करणार असून कारवाईबाबत नेतेच निर्णय घेतील अशी सावध प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे गटनेते मेनुद्दीन बागवान यांनी दिली.

तर राष्ट्रवादीने आपल्याला दिलेला शब्द पूर्ण केला नाही तसेच आघाडी धर्माचे पालन केले नाही. राष्ट्रवादीचे सर्व सदस्य झाभागृहात असते तर नक्की आम्ही चमत्कार केला असता मात्र राष्ट्रवादीचे सदस्य गैरहजर राहिल्याने आम्ही काहीच करू शकलो नाही, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते संजय मेंढे यांनी देत यापुढे राष्ट्रवादी सोबत राहायचं किंवा नाही याबाबत आमच्या नेत्यांशी बोलू असेही मेंढे म्हणाले.

Related Stories

सांगलीत चहा विक्रेत्या वृद्ध महिलेचे दागिने लुटले

Archana Banage

सांगलीत विद्यार्थी रस्त्यांवर;खड्डे बुजवत केले अनोखे आंदोलन

Abhijeet Khandekar

क्रीडा पुरस्कारासाठी 26 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करा :जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे

Archana Banage

मिरजेत बिबट्याची कातडी, सांबरांची शिंगे आणि खवल्या मांजराच्या खवल्या जप्त

Archana Banage

कडेगाव तलावात सध्या केवळ ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक

Archana Banage

सांगली : मिरजेतील व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध

Archana Banage