Tarun Bharat

हिमाचल प्रदेशमधील भाजपच्या ‘आपरेशन लोट्स’ला वेग…कॉंग्रेसचीही योजना

Operation Lotus : हिमाचल प्रदेशमधील ( Himachal Pradesh ) निकालानंतर भाजपची यंत्रणा कमालीची सक्रिय झाली असून या राज्य़ामध्ये मिळालेल्या अपयशानंतर तिथेही ‘ऑपरेशन लोट्स’ (Operation Lotus) राबवण्यासाठी भाजपचे धुरिण हिमाचल प्रदेशमध्ये दाखल झाले आहेत. ‘ऑपरेशन लोटस’ हाणून पाडण्यासाठी कॉंग्रेसने हिमाचलच्या विजयी आमदारांना राजस्थानमध्ये हलवण्याची काँग्रेसची योजना आखली आहे.

गुजरात (Gujrat) आणि हिमाचल प्रदेशमधील निवडणुकांचे निकाल हाती येताच भारतीय जनता पक्षाच्या गोटात कही खुशी…कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संपुर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्य़ा गुजरातमध्ये विक्रमी जोरदार मुसंडी मारून राज्यावर आपली एकहाती सत्ता कायम ठेवली. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे भाजपने आपला संपुर्ण मोर्चा हिमाचल प्रदेशकडे वळवला असून हिमाचल प्रदेशमध्ये ऑपरेशन लोट्स राबण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत.
कॉंग्रेसने हिमाचल प्रदेशमध्ये आश्चर्यकारक 40 जागांवर मुसंडी मारली आहे. तर भाजप 27 जागांपर्यंत खाली घसरला आहे. बहुमतासाठी 35 जागंची आवश्यकता असून कॉंग्रेसने बहुमत मिळवले आहे. पण अपक्षांना हाताशी धरून भाजप ‘ऑपरेशन लोटस’साठी हालचाली करत आहे. यासाठी भाजपचे महासचिव विनोद तावडे यांना शिमला येथे दाखल झाले असून सत्तास्थापनेसाठी विनोद तावडे यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली आहे.

भाजपच्या या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी काँग्रेसने आपली व्युहनिती आखली असून हिमाचल प्रदेशातील आमदारांना राजस्थानमध्ये हलवण्याची तयारी करत आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपिंदरसिंग हुडा यांच्यावर ही कामगिरी सोपवली असून ‘ऑपरेशन लोटस’ च्या आधी आमदारांना हलवण्याचे काम ते करणार आहेत. या वाढत्या घडामोडीवर कॉंग्रेसच्या राष्ट्रिय सरचिटणीस प्रियांका गांधी- वाड्रा यांचे वैयक्तिकरित्या लक्ष असून त्या आज शिमला येथे पोहोचणार आहेत.

हिमाचल प्रदेशात काँग्रेसने आश्चर्यकारकरित्या आघाडी घेतली असून त्यांचे उमदेवार ३८ जागांवर आघाडीवर आहेत. तर भाजपची २७ जागांपर्यंत खाली घसरण झाली आहे. हिमाचल प्रदेशात बहुमतासाठी ३५ जागांची आवश्यकता आहे. सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेसला हिमाचल प्रदेशात सत्ता स्थापन करणे शक्य आहे. मात्र, याचवेळी भाजपच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. यापूर्वी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास भाजपने अपक्षांना गळाला लावण्याच्या तयारी केली होती. मात्र, आता काँग्रेसने सरशी साधल्यामुळे भाजपकडून आता हिमाचल प्रदेशात ‘ऑपरेशन लोटस’ राबवले जाण्याची शक्यता आहे.

Related Stories

रॉयल एनफिल्डने मागवल्या क्लासिक बाईक्स

Patil_p

अबकी बार करोडो बेरोजगार…म्हणत राहुल गांधींनी साधला मोदी सरकारवर निशाणा

Archana Banage

‘जैश’च्या 3 दहशतवाद्यांचा अवंतीपोरामध्ये खात्मा

Patil_p

माहितीपटाच्या पोस्टरमुळे दुखावल्या भावना

Patil_p

कोर्टाच्या सुनावणीनंतर शिवसेना नेते सुभाष देसाई आणि अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया; काय म्हणाले, वाचा सविस्तर

Abhijeet Khandekar

एअर इंडियाच्या सीईओंचा माफीनामा

Patil_p