Tarun Bharat

गुजरातेत भाजपचा ‘रेकॉर्ड ब्रेक’ विजय

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा विश्वास

प्रतिनिधी /पणजी

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा ‘रेकॉर्ड ब्रेक’ मतांनी विजय होईल, अशी खात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. भाजपच्या ‘डबल इंजिन’ सरकारची ताकद तेथे दिसेल, असे ते म्हणाले.

पणजीतील एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, गुजरातमध्ये भाजपसाठी चांगले वातावरण असून आतापर्यंतचे तेथील सर्व रेकॉर्ड तोडले जातील आणि भाजपला सर्वाधिक मते मिळतील. भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार गुजरातमध्ये स्थापन होईल. गेल्या 27 वर्षानंतरही तेथे भाजपचेच कमळ फुलणार आहे, असा विश्वास डॉ. प्रमोद सावंत यांनी वर्तविला. डबल इंजिन सरकारची खरी ताकद गुजरात निवडणुकीतून समोर येईल.

दिल्ली शहराची परिस्थिती बिकट

दिल्लीच्या पालिका निवडणुकीत आपण प्रचार केल्याचे सांगून तेथेही भाजपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्या निवडणुकीतही भाजपचा विजय होणार असल्याचा दावा डॉ. सावंत यांनी व्यक्त केला आहे. दिल्ली शहरातील परिस्थिती बिकट असून चांगले रस्ते, गटारे नाहीत. ‘आप’ ने तेथे काहीच केलेले दिसत नाही. गोव्यातील ‘आप’ च्या लोकांनी तेथे जाऊन वस्तुस्थिती पहावी.

दिल्लीत पैसे भरुनही वीज मिळत नाही

मोफत वीज सोडाच, पण पैसे भरूनही वीज मिळत नसल्याच्या तक्रारी लोकांनी केल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली. दिल्लीतील ‘आप’ सरकारच्या कामाची गोव्यात तारीफ होते. परंतु तेथे तसे काहीच दिसत नाही, असा टोमणा डॉ. सावंत यांनी मारला.

Related Stories

डय़ुरँडमध्ये एफसी गोवाचे जमशेदपूरवर पाच गोल; आर्मी ग्रीन बाद फेरीत

Amit Kulkarni

सांगेत सावित्री कवळेकर यांच्याकडून प्रचारास प्रारंभ

Amit Kulkarni

विना ‘व्यवस्थापन’ सिग्नल ‘व्यवस्था’!

Omkar B

फोंडय़ात अभिषेक बुक सेंटरचे भव्य ग्रंथ प्रदर्शन

Amit Kulkarni

आग विझली; पण चिंता कायम

Amit Kulkarni

अखेर नु शी नलीन जहाज अरबी देशांकडे रवाना होणार

Patil_p