Tarun Bharat

भाजपाचा सेवा पंधरावढा उपक्रमाची फलटणमधून होणार सुरुवात

प्रतिनिधी/ फलटण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. सातारा जिह्याची सुरुवात फलटणपासून करणार येत असल्याची माहिती माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. 

 भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली सेवा पंधरावडा साजरा केला जाणार आहे. सातारा जिह्यामध्ये सुद्धा याचे मोठय़ा स्वरूपात नियोजन केले जाणार आहे. भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे व माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांनी नुकतीच फलटण तालुका व शहर भाजप पदाधिकाऱयांची बैठक घेऊन त्यामध्ये पदाधिकायांना याबाबत माहिती दिली. ही माहिती देताना खासदार रणजीतसिंह बोलत होते. यावेळी भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, पश्चिम महाराष्ट्र युवा मोर्चाचे सह संपर्कप्रमुख सुशांत निंबाळकर, भाजपा माळशिरस तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर, फलटण तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा उषा राऊत यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

   कोरोनाची लस देण्यासंदर्भात लसीकरण केंद्रांचे स्टॉल ठिकठिकाणी लावण्यात येणार असून, वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबवली जाणार आहे. जल हेच जीवन याची प्रत्येक मंडलातील घरोघरी जाऊन जल संरक्षणाचे उपाय सांगितले जाणार आहेत. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविला जाणार आहे. आत्मनिर्भर भारताच्या यशाची कामे व्होकल फोर लोकलच्या माध्यमातून संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवली जाणार असून जिह्यातील बुद्धिजीवी व्यक्तींची निवड करून त्यांचे संमेलन भरविले जाणार आहे. अशा प्रकारे हा सेवा पंधरवडा साजरा केला जाणार असून याची माहिती समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचवली जाणार आहे असे आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले.

 जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी प्रास्ताविकात सेवा पंधरावढय़ाचा स्वरूप व उद्देश स्पष्ट केला. सेवा पंधरवडा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व आघाडय़ा व मोर्चाचे पदाधिकारी आणि सभासद यांनी मोठय़ा प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.  

पंतप्रधानाच्या जीवनावर आधारीत प्रदर्शन

 भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे म्हणाले, सेवा पंधरवडय़ामध्ये जिल्हा व मंडल स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. जनकल्याणकारी योजना व प्रशासकीय कार्यकौशल्य विषयी पुस्तकांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. भाजपा युवा मोर्चाच्यावतीने प्रत्येक जिह्यात रक्तदान व विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जाणार आहे. प्रत्येक जिह्यात दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव व उपकरणे याचे वितरण, तसेच मोदी सरकारने 2025 पर्यंत संपूर्ण भारत क्षयरोगमुक्त करण्याचा संकल्प केला आहे.  त्या दृष्टीने टीबी रोगाने ग्रासलेल्या व्यक्तीला प्रत्येक मंडल स्तरावर दत्तक घेऊन त्याचे पालन पोषण, रोजगार व औषध उपचाराची सेवा लोकसभागातून केली जाणार आहे. 

Related Stories

महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेत बेळगावातील दोन रुग्णालयांचा समावेश

Archana Banage

जळगाव वसतिगृहात महिलांवर अत्याचाराची कोणतीही घटना घडली नाही : गृहमंत्री

Tousif Mujawar

नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात

datta jadhav

किरीट सोमय्या सोमवारी शिवसेना-राष्ट्रवादी नेत्यांच्या घोटाळ्यांचा बॉम्ब फोडणार

Archana Banage

कोल्हापूर : शिवसेनेचा कृषी विधेयका विरोधात बैलगाडी मोर्चा

Archana Banage

‘ऑनलाईन’ शिक्षणामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात

Archana Banage