Tarun Bharat

‘Black Fungus’वरुन राहुल गांधींचे मोदी सरकारला तीन प्रश्न

नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

देशात कोरोनाने थैमान घातले असतानाच आता काळ्या बुरशीचा देखील (Black Fungus) संसर्ग होत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी वारंवार देशातील कोरोना स्थितीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आता देखील राहुल गांधी यांनी काळ्या बुरशीचा संसर्ग यावरून केंद्रातील मोदी सरकारला तीन प्रश्न विचारले आहेत. या विरोधात लढण्यासाठी केंद्राची काय तयारी आहे? काळ्या बुरशीवरील औषध मिळण्यासाठी सरकारचा काय प्लॅन आहे? असे प्रश्न राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारले आहेत.

राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारला काळ्या बुरशीबद्दल तीन प्रश्न विचारले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, काळ्या बुरशीच्या औषधाच्या कमतरतेबाबत सरकार काय करत आहे? तसेत त्यांनी दुसरा प्रश्न विचारलं आहे की, हे औषध रुग्णांना देण्याची प्रक्रिया काय आहे ? आणि उपचार देण्याऐवजी मोदी सरकार औपचारिकतेत जनतेला का गुंतवित आहे? , असे तीन प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत.

राहुल गांधी देशातील कोरोना स्थितीवरून सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर टीका करत असतात. कधी लसीकरणाच्या तुटवड्यावरून तर कधी ऑक्सीजनची कमतरता यावरून त्यांनी वारंवार केंद्रावर निसाणा साधला आहे.

Related Stories

प. बंगालच्या पेगॅसस चौकशीला स्थगिती

Patil_p

कोविड प्रोटोकॉल पाळण्याचे राज्यांना निर्देश

Patil_p

भारत-अमेरिका करणार एकत्र नौदल सराव

Patil_p

भारत-बांगलादेश ‘मैत्री सेतू’चे लोकार्पण

Patil_p

तोयबा दहशतवाद्याला आसाममध्ये अटक

Patil_p

देशात बाधितांचा आकडा 94 लाखांच्या टप्प्यात

Patil_p