बेळगाव परिसरात खव्यासाठी वापर : दूध पावडर ताब्यात
प्रतिनिधी /बेळगाव
पोषण आहारांतर्गत सरकारकडून दिल्या जाणाऱया दूध पावडरचा वापर खवा तयार करण्यासाठी केला जात आहे. बेळगाव परिसरातील अनेक ठिकाणी खव्यासाठी सरकारी दूध पावडरचा वापर होत असल्याची माहिती हाती आली आहे.
बेळगाव तालुक्मयातील अनेक गावात खवा तयार केला जातो. त्यासाठी पोषण आहारांतर्गत वाटप केल्या जाणाऱया दूध पावडरचा वापर खव्यासाठी केला जातो. अन्न व नागरीपुरवठा विभागाच्या अधिकाऱयांच्या पाहाणीत अनेक ठिकाणी असा प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी अलारवाड ब्रिजजवळील एका स्वीटमार्टमध्ये सरकारी दूध पावडर ताब्यात घेण्यात आली आहे.
एका स्वीटमार्टमध्ये खवा तयार करण्यासाठी सरकारी दूध पावडरचा वापर केला जात होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अधिकाऱयांनी तो ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. हे अधिकारी फिर्याद दाखल करण्यासाठी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत यासंबंधीची प्रक्रिया सुरू होती. रेशन तांदळाचा मोठय़ा प्रमाणात काळाबाजार केला जातो. एका बेळगाव जिल्हय़ात अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. काही वर्षांपूर्वी बागलकोट जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात सरकारी दूधपावडर जप्त केली होती. बेळगाव परिसरातही खव्यासाठी सरकारी दूध पावडरचा वापर केला जात असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे.