Blood Donation Amrit Mahotsav celebrated in Sawantwadi–
रक्तदान अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून भारताच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानने सावंतवाडी रक्तपेढीत आयोजित केलेल्या रक्तदान अमृतमहोत्सवाला चांगला प्रतिसाद लाभला. या रक्तदान शिबिरासाठी अवघ्या दोन दिवसाचा अवधी मिळूनही सिंधुरक्तमित्रांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे रक्तदात्यांनीही खऱ्या अर्थाने रक्तदान अमृत महोत्सव साजरा केला.
महाराष्ट्र राज्य रक्तसंक्रमण परिषदेने या रक्तदान अमृतमहोत्सवासाठी १७ सप्टेंबर ही तारीख विशेष तारीख म्हणून दिली होती. योगायोग म्हणजे या तारखे एवढाच या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांचा १७ हा जादुई आकडा गाठला गेला. यासाठी लायन्स क्लबचेही सहकार्य लाभले. यावेळी रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्यावतीने ऑनलाईन सर्टिफिकेट देऊन सन्मान करण्यात आला.
ओटवणे / प्रतिनिधी-