वार्ताहर/ कडोली
जिल्हा पंचायत, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते, जिल्हा रक्त भांडार, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत कडोली आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कडोली येथील आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले.
सामाजिक कार्यकर्ते नीळकंठ कुरबर (उचगाव) यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर अनेक दानशूर व्यक्तींनी रक्तदान केले. यावेळी नीळकंठ कुरबर, आरोग्य अधिकारी डॉ. विनय हळ्ळीकेरी यांनी मार्गदर्शन केले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. सहकाऱ्यांनी शिबिर यशस्वी पार पाडले. यावेळी पत्रकार सुनिल पाटीलही उपस्थित होते.