ओटवणे प्रतिनिधी-
लोकमान्य मल्टीपर्पोज सोसायटी लिमिटेड सावंतवाडी शाखा, युवा रक्तदाता संघटना आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढीत शुक्रवारी ८ जुलै रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक रक्तदात्यांनी नावे लोकमान्य मल्टीपर्पोज को ऑफ सोसायटी सावंतवाडी शाखेत नोंदवावीत किंवा देव्या सुर्याजी 9922088238 आणि मिहीर मठकर , वसंत सावंत यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
युवा रक्तदाता संघटनेकडून अन्न व औषध प्रशासनाचा निषेध
दरम्यान अन्न व औषध प्रशासनाने एलायजा टेस्ट बंधनकारक केल्याने अत्यंत तातडीच्या व दुर्मिळ रक्तगट असलेल्या रुग्णांना रक्ताची आवश्यकता असल्यास रक्तदाते उपलब्ध असूनही रक्त देता येत नाही. पर्यायाने रक्तदाता असूनही रुग्णांचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे अत्यंत तातडीच्या रुग्णांना स्पाॅट टेस्ट करण्याचे निर्देश देण्यात यावेत. यासाठी युवा रक्तदाता संघटना काळी फित बांधून FDA च्या विरोधात निषेध करत रक्तदान करणार असल्याचे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी सांगितले.Attachments area