Blood donation camp on the occasion of Ravindra Chavan’s birthday
भारतीय जनता पार्टी दोडामार्ग आणि गोवा मेडिकल कॉलेज ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील ग्रामीण रुग्णालयात आज रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिराला अनेकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, जि. प. चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, नगरसेवक संतोष नानचे, पांडुरंग बोर्डेकर, डॉ. संजय खडपकर, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश गवस, यासह चंदू मळीक, रमेश दळवी, भैया पांगम, संजय विर्नोडकर, सुरेंद्र सावंत, यांसह भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गोवा मेडिकल कॉलेजचे डॉक्टर आणि कर्मचारीही, हळबे आ. केसरकर महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. आमदार दीपक केसरकर सायन्स महाविद्यालय व लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालय यांच्या विद्यार्थ्यांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
दोडामार्ग – वार्ताहर