Tarun Bharat

रक्तदानामुळे रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य

Advertisements

आयएमएच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी /बेळगाव

रक्तदान हे महादान असून रक्तदानामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचविता येतात, असे प्रतिपादन डॉ. यलबुर्गी यांनी केले. आयएमए बेळगाव शाखा, गिजरे प्राईम केअर हॉस्पिटल व गणेश युवक मंडळ यांच्यावतीने गणेशपूर येथे आयोजित रक्तदान शिबिरात ते बोलत होते.

रक्तदानाचे मोठे फायदे आहेत. परंतु रक्तदान करताना काही नियम पाळावे लागतात. त्यामुळे रक्तदान कोण करू शकतो, तसेच कोण करू शकणार नाहीत, याची माहिती नागरिकांनी घेणे गरजेचे आहे, असेही डॉ. यलबुर्गी यांनी स्पष्ट केले. डॉ. व्ही. जी. गोवेकर यांनी लष्करात रक्ताची कशी गरज असते याबाबत आपले अनुभव कथन करून रक्तदानासाठी युवकांनी पुढे येण्याचे आवाहन केले.

आयएमएच्या अध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ, गिजरे हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. दत्तप्रसाद गिजरे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश लोहार, खन्नूरकर यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी अनेक वेळा रक्तदान केलेले डॉ. अभिजित देशपांडे व डॉ. व्ही. जी. गोवेकर यांचा सत्कार करण्यात आला. महावीर ब्लड बँकेच्यावतीने डॉ. यलबुर्गी व त्यांच्या सहकाऱयांनी रक्तसंकलन केले.

Related Stories

जिल्हय़ात आणखी दोघे रुग्ण कोरोनामुक्त

Patil_p

वारंवार विमाने रद्द होत असल्याने प्रवासी हैराण

Amit Kulkarni

जिल्हा पोलीस प्रमुख संघाकडे श्री चषक

Amit Kulkarni

साईडपट्टय़ा खराब झाल्यानेच कौंदल वळणाजवळ अपघात

Amit Kulkarni

सर्व विद्यार्थ्यांना लॅपटॉप द्या अभाविपीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Patil_p

येळ्ळूर परिसरात भातांवर मावा रोगाचा प्रादुर्भाव

Patil_p
error: Content is protected !!