Blood donation protest on Saturday against blood price increase!
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे आंदोलन
ओटवणे / प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने रक्तपिशवीचे शुल्क ४५० रुपयावरुन तब्बल ११०० रूपये केले आहे. रक्तासारख्या महत्त्वाच्या घटकावरील ही दरवाढ सर्वसामान्य जनतेला परवडणारी नसून ती तात्काळ थांबवावी. त्यामुळे या दरवाढी विरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवा रक्तदाता संघटना शनिवारी १८ मार्च रोजी सावंतवाडीत ‘रक्तदान आंदोलन’ छेडणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी दिली.याबाबत संघटनेने जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना गुरुवारी दिलेल्या निवेदनात रक्तपिशवी दरवाढीबाबत शासनाचे लक्ष वेधूनही कोणतीही दखल घेतली घेतली नाही. त्यामुळे रक्तासारख्या महत्वाचा विषयाबद्दल शासन संवेदनशील नसल्याचे दिसून येते. पर्यायाने या रक्तपिशवी दरवाढी विरोधात राज्य शासनासह संबंधित प्रशासनाला जाग आणण्यासाठीच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये ‘रक्तदान आंदोलन’ छेडणार असल्याचे देव्या सुर्याजी यांनी सांगितले.शनिवारी सकाळी १० वाजता हाताच्या दंडावर काळी पट्टी बांधून रक्तदान आंदोलन छेडण्यात येणार आहे. या रक्तदान आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीला महाराष्ट्र सरकार व प्रशासन जबाबदार राहणार असल्याचा इशाराही युवा रक्तदाता संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.