पोर्तुगालमधील नदीचे अंतराळातून अनोखे दर्शन
पृथ्वीवर अनेक चकित करणाऱया गोष्टी आहेत. यापैकी एक आहे ब्ल्यू ड्रगन रिव्हर. ड्रगन हा शब्द नावात समाविष्ट असला तरीही याचे चीनशी काहीच देणेघेणे नाही. ही नदी पोर्तुगालमध्ये असून ती अंतराळतून पाहिल्यास ड्रगनप्रमाणे दिसून येते. या नदीचे खरे नाव ओडिलीट आहे.
पोर्तुगालच्या अलगार्वे प्रांताच्या कास्त्राs मारिम नगरपालिकेच्या अंतर्गत ही नदी येते. या नदीवर एक धरण देखील आहे, ही नदी अत्यंत सुंदर असल्याने ती पाहण्यासाठी दरवर्षी हजारो लोक येत असतात. या नदीला पहिल्यांदा ड्रगनच्या स्वरुपात छायाचित्रकार स्टीव्ह रिचर्ड यांनी पाहिले होते. या नदीवरून विमानातून जात असताना त्यांनी याचे छायाचित्र काढले होते, हे छायाचित्र एखाद्या निळय़ा रंगातील ड्रगनसारखे दिसून येते.
चीनमध्ये ड्रगनला पवित्र जीव मानले गेले आहे. चीनच्या संस्कृतीत ड्रगनला शक्ती आणि क्षमतेचे प्रतीक मानले जाते. स्टीव्ह यांचे छायाचित्र व्हायरल झाल्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर याची चर्चा होऊ लागली. विशेषकरून चीनमधून दरवर्षी हजारो पर्यटक पोर्तुगालमध्ये पोहोचत असतात.
या नदीला पाहण्याचा खरा आनंद आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून प्राप्त होतो. कारण तेथून ही नदी स्वतःचे ड्रगन स्वरुप पूर्णपणे दाखविते. ब्ल्यू ड्रगन रिव्हर ही गाडियाना नदीचे उपनदी आहे.