Tarun Bharat

BMW ची ‘ग्रॅन कुपे’, ‘एम 8 कुपे’ भारतात लॉन्च

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जर्मनीची प्रसिद्ध लग्झरी कार उत्पादक कंपनी BMW ने  8 सीरिज ‘ग्रॅन कुपे’ आणि ‘एम 8 कुपे’ या लग्झरी स्पोर्ट्स कार भारतात लॉन्च केल्या आहेत.
 

8 सीरिज ग्रॅन कुपेमध्ये बीएमडब्ल्यू ‘840i ग्रॅन कुपे’ आणि बीएमडब्ल्यू ‘840i ग्रॅन कुपे एम स्पोर्ट’ हे दोन प्रकार आहेत. 840i ग्रॅन कुपेची एक्स शोरूम किंमत 1.29 कोटी रुपये आहे. तर  840i ग्रॅन कुपे एम स्पोर्टची एक्स-शोरूम किंमत 1.55 कोटी रुपये आहे. या कारला 3 लीटरचे सहा सिलिंडर असलेले बीएस 6 पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. 
 

तर ‘एम 8 कुपे’मध्ये चार लीटरचे 8 सिलिंडर असलेले पॉवर टर्बो इंजिन देण्यात आले आहे. ट्विन पॉवर टर्बो टेक्नोलॉजीच्या मदतीने इंजिन अधिक पॉवर जनरेट करते. तसेच कमी स्पीडमध्ये चांगला रिस्पॉन्स करते. हे इंजिन 340 एचपीचे पॉवर आणि 1600-4500 आरपीएमवर 500 एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. ही कार केवळ 5.2 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग पकडते. या कार ऑर्डरनुसार कंपनीच्या डिलरकडे उपलब्ध करण्यात येतील. भारतीय बाजारात या कारची किंमत  2.15 कोटी रुपये आहे. 

Related Stories

टाटाकडून जागतिक स्तरावर 3 लाख कार्सची विक्री

Patil_p

मार्च महिन्यात वाहन नोंदणीत घसरण

Amit Kulkarni

ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर अखेर बाजारात

Patil_p

‘हिरो डेस्टिनी 125’ भारतात दाखल

Patil_p

टाटाच्या सीएनजी कार्स दाखल

Patil_p

भारतात बीएमडब्ल्यूची इलेक्ट्रिक सेडान आय 4 दाखल

Amit Kulkarni
error: Content is protected !!