Tarun Bharat

भारतात बीएमडब्ल्यूची इलेक्ट्रिक सेडान आय 4 दाखल

Advertisements

गुरुग्राम :  जर्मन लक्झरी कंपनी बीएमडब्ल्यूने भारतामध्ये इलेक्ट्रिक सेडान आय4 हे मॉडेल सादर केले आहे. सदरच्या कारची सुरुवातीची किमत ही 69.9 लाख रुपये राहणार असल्याची माहिती आहे. कंपनीने मागील वर्षात नोव्हेंबरमध्ये आपल्या इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रवासासह देशामध्ये सहा महिन्यांच्या आत तीन इलेक्ट्रिक वाहने सादर करणार असल्याची घोषणा केली होती. कंपनीने या अगोदर आपली संपूर्ण इलेक्ट्रिक एसयूव्ही आयएक्स आणि पूर्ण इलेक्ट्रिक मिनी लक्झरी हॅचबॅक कार सादर केली आहे. आय4 पूर्णपणे आयात करण्यात येणार आहे. बीएमडब्ल्यू आय 4 ला कंपनीच्या वेबसाईटच्या मदतीने बुकिंग करण्याची सोय उपलब्ध होणार आहे.  कंपनीने यावेळी दावा केला आहे, की 5.7 सेकंदात शून्य ते 100 किलोमीटर प्रति तास हा वेग घेणार असल्याचे म्हटले आहे. यासोबतच आगामी वर्षापर्यंत देशात या गाडीची विक्री ही एकूण विक्रीत वाटा 10 टक्के अधिकचा राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Related Stories

इलेक्ट्रिक दुचाकीचे दहा लाख विक्रीचे ध्येय अडचणीत

Patil_p

कीया मोटर्सची नवी सेल्टॉस दाखल

Patil_p

ऑडीची क्यु 2 उत्सवी काळात बाजारात

Patil_p

तिसऱया आर्थिक वर्षात दुचाकी विक्री घसरणार

Patil_p

रॉयल इनफिल्डची हिमालयन मोटारसायकल

Patil_p

मारुतीने डिझायर टूर कार्स परत मागविल्या

Patil_p
error: Content is protected !!