Tarun Bharat

गोवा अर्बनचे संचालक मंडळ बिनविरोध

Advertisements

 डॉ.अनिल गावणेकर पुन्हा अध्यक्ष

प्रतिनिधी /फोंडा

दी गोवा अर्बन सहकारी बँकेच्या नूतन संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली असून डॉ. अनिल एन. एन. गावणेकर यांची अध्यक्षपदी तर संदीप खांडेपारकर यांची उपाध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. सन 2022 ते 2027 या पुढील पाच वर्षासाठी हे नूतन संचालक मंडळ निवडण्यात आले आहे. 

पणजी येथील गोवा अर्बनच्या मुख्य कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली. अकरा संचालक मंडळामध्ये डॉ. अनिल गावणेकर, संदीप खांडेपारकर, रोहन म्हांब्रे, व्यंकटेश नाईक, डॉ. अजय करंदे, प्रदीप प्रभू चोडणेकर, राजेंद्र भोबे, शिवाजी बी. एस. भांगी, केशव केरकर, रिटा दुकळे व अन्नपूर्णा केरकर यांचा समावेश आहे. निर्वाचन अधिकारी म्हणून सहकार खात्याचे मंगेश फडते यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अनिल गावणेकर हे गेली 45 वर्षे संचालक म्हणून बँकेवर कार्यरत आहे. गोवा अर्बनच्या पन्नास वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले आहे. गोव्यातील एक अग्रगण्य व विश्वासार्ह बँक म्हणून गोवा अर्बनची ख्याती आहे.

Related Stories

दोनापावलाचे कन्वेंशन सेंटर हा मोठा घोटाळा

Patil_p

कोरोना लढय़ात सरकारला मदतीचा हात देणार

Patil_p

कारवारला कोकणी – कन्नड वाद उफाळला

Amit Kulkarni

पाळोळे येथील प्रसाधनगृहाचे उद्या उद्घाटन

Amit Kulkarni

निवडणुकीत मतदारांचा सहभाग

Amit Kulkarni

दिगास, पंचवाडी अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

Patil_p
error: Content is protected !!