Tarun Bharat

सांगलीत होड्यांच्या शर्यतीचा थरार अन् अचानक नदीत बोट उलटली; व्हिडिओ व्हायरल

Advertisements

सांगली : कृष्णा नदी पात्रात काल होड्यांच्या शर्यती लावण्यात आल्या होत्या. मात्र अचनाक शर्यती दरम्यान स्पर्धकांची बोट उलटली. मात्र यात कोणाची जिवीतहाणी झाली नाही. नदी पात्रात पडलेले स्पर्धक पोहत काठावर आले. पण बोटीला जलसमाधी मिळाली. मात्र बघ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा हा क्षण होता. याचा व्हिडिओ काल सोशल मिडियावर शेअर झाला होता. होड्यांच्या शर्यतींचा हा थरार पाहण्यासाठी कृष्णाकाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

सायंकाळी पाचला स्पर्धेला सुरवात झाली. आयर्विन पुलाजवळ समांतर पुलाचे काम सुरू असल्याने पाण्याला मोठ्या प्रमाणावर ओढ होती. त्यात अत्यंत चुरशीने सामने झाले. माजी नगरसेवक दिलीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीवाडीतील फ्रेंड्स यूथ फाउंडेशन, रणसंग्राम मंडळ आणि जिल्हा रोईंग असोसिएशनतर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सांगली जिल्ह्यातील नऊ बोट क्लब या स्पर्धेत सहभागी झाले होते.

Related Stories

सांगली जिल्ह्यात दोन नवे रुग्ण; कुंडलवाडी येथील युवकास कोरोनाची लागण

Archana Banage

‘अलमट्टी’बाबत ‘पाटबंधारे’ने समन्वय ठेवावा : पालक सचिव प्रवीण दराडे

Abhijeet Khandekar

हरिपूर रस्त्यावरील लोखंडी पुलाला रेलिंग लावा

Archana Banage

सांगली : शाळा, कॉलेज आज सुरू, सिटी बस मात्र बंदच !

Archana Banage

मणेराजुरीतील खंडोबा ओढ्यावरील अरुंद पुलावरून दारूची वाहतूक करणारा ट्रक उलटला

Archana Banage

सांगली : कुपवाडमध्ये बंद फ्लॅट फोडला: तीन लाखांची रोकड लंपास

Archana Banage
error: Content is protected !!