तपासासाठी एसआयटीची स्थापना
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्हय़ात भाजप नेत्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला आहे. मृत नेत्याचे नाव सोम राज असून ते सोमवारपासून बेपत्ता होते. हीरानगर भागात त्यांचा हा मृतदेह सापडला आहे. सोम राज यांच्या मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.
नेत्याच्या मृतदेहावर रक्ताचे डाग आढळून आल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय सोम राज यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. अनेक भाजप नेत्यांनी देखील याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती. हीरानगर पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे.